घरक्राइममुंबईत खळबळ! चार वर्षापासून पगार थकल्याने पीएसआयने केली आत्महत्या

मुंबईत खळबळ! चार वर्षापासून पगार थकल्याने पीएसआयने केली आत्महत्या

Subscribe

गेल्या ४ वर्षांपासून पगार थकल्यामुळे या पीएसआयने आपलं जीवन संपवून टाकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

राज्यभरात एकीकडे मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती होत असताना, दुसरीकडे मात्र पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार थकला असल्याचे वास्तव समोर आले आहे. याच अनुषंगाने, मुंबई पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षापासून पगार थकला असल्यामुळे मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने मुंबई पोलीस दलात खळबळ माजली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुंबई दौऱ्यावर येणार; 2 वंदे भारत एक्स्प्रेसना दाखवणार हिरवा झेंडा?

- Advertisement -

प्रकाश काशिनाथ थेतले असं आत्महत्या केलेल्या पीएसआयचं नाव आहे. सुरुवातीला ते नवी मुंबई कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या चार वर्षांपासून त्यांचा पगार थकला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली मुंबईत झाली. मुंबईतील चुनाभट्टी भागात ते राहू लागले होते. गेल्या अनेक महिन्यापासून ते टीबीच्या आजाराचा सामना करत होते. घरची परिस्थ‌िती हलाखीची असल्याने त्यांना टीबीवर उपचार करण्यासाठी पैशांची जमवाजमव करण्यातही अपयश येऊ लागले. एकीकडे पगार थकला होता आणि दुसरीकडे टीबीचा त्रास वाढू लागला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते. थेतले यांना दारूचे व्यसन होते.

हेही वाचा – देशाच्या महत्वाकांक्षेवर हा नियोजित हल्ला; हिंडनबर्गच्या ‘त्या’ आरोपांना अदानी ग्रुपकडून प्रत्युत्तर

- Advertisement -

ड्यूटीवर ते नेहमी गैरहजर राहत होते. कोपरखैरणे पोलिस ठाण्यातून २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बदली होऊन ते मुंबईत आले होते. २९ जानेवारी रोजी रात्री चुनाभट्टी येथील त्यांच्या राहत्या घरी असताना कुटुंबीयांना ‘take care’ असा मेसेज करून गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिली होती. “कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभले”, असा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला असल्याची माहिती चुनाभट्टी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देसाई यांनी दिली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ३२,००० रुपयांची मदत पुरविण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -