Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईकरांनो गर्दीमुळे वाढतोय कोरोना, लांब पल्ल्याच्या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

मुंबईकरांनो गर्दीमुळे वाढतोय कोरोना, लांब पल्ल्याच्या स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता मध्य रेल्वे प्रशासनाचे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काही महत्त्वाच्या स्थानकांवर लोकांची गर्दी होत असल्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मध्य रेल्वेने बंदी घातली आहे. सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांचा यात समावेश आहे. त्यामुळे येत्या दिवसांपासून या सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म मिळणार नाही आहेत.

म्हणून उचलले मध्य रेल्वेन प्रशासनाने हे पाऊल….

मिनी लॉकडाऊन झाल्यापासून अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतू लागले. तसेच उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळे देखील अनेक लोक गावी जात होते. यावेळी या प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक प्लॅटफॉर्मवर गर्दी करू लागले. या गर्दीमुळे कोरोना धोका अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले. सीएमएमटी, एलटीटी, दादर स्थानकांवर प्रचंड प्रमाणात गर्दी होत होती. हेच लक्षात आल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

यापूर्वी स्थानकांवरील गर्दीवर आळा घालण्यासाठी उपाय म्हणून प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत वाढवून ती ५० रुपये करण्यात आली. तरी देखील गर्दी कमी झाली नाही. त्यामुळे आता अखेर मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट रद्द करण्यात आले असून प्रवाशांव्यतिरिक्त इतर नातेवाईकांना या स्थानकांवर जाता येणार नाही आहे.


हेही वाचा – ..तर सर्वसामान्यांचा लोकल प्रवेश बंद – वडेट्टीवार


- Advertisement -

 

- Advertisement -