शिवसेनेचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, संभाजीराजे समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

Sambhaji Raje's supporters criticized Shiv Sena by waving banners in front of Shiv Sena Bhavvas

संजय पवारांचा पराभव झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती समर्थकांनी शिवसेना भवन समोर एक बॅनर लावला आहे. या बॅनरव छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान करणाऱ्या शिवसेनेचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार, असे लिहीले आहे. राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या संभाजीराजेंनी शिवसेनेकडे जाहीर पाठिंबा मागितला होता. मात्र, शिवसेनेने तो नाकारून संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाराजी दर्शवत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. संजय पवार यांचा मात्र भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासमोर पराभूत झाले.

शिवसेना भवन समोर बॅनर –

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संभाजीराजेंनी तिब्र प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनासमोर आज बॅनरबाजी केली. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या आपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.

संभाजी राजेंची प्रतिक्रिया –

छत्रपती संभाजीराजेंनी बॅनरबाजीवर प्रतिक्रीया दिली आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे फ्लेक्स लावले आहेत. त्याच्या प्रमाचा मी आदर करतो. मात्र, कोणत्याही पक्षाल खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही. मी राजकारणात येणार असलो तरी स्वराज्य ला तत्त्वांची बैठक असेल, असे ट्विट संभाजीराजेंनी केले आहे.