धक्कादायक : आर्यन खानला फसवून खंडणी वसुलीचा वानखेडेचा प्रयत्न, CBI करणार चौकशी

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर समीर वानखेडे यांच्या पथकाने छापा टाकला, त्यानंतर आर्यन खानवर गुन्हा दाखल होण्यास वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण याबाबतचे कारण आता समोर आले आहे.

Sameer Wankhede attempt recover extortion by cheating Aryan Khan, CBI will investigate

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला अटक केली. तपासाचा एक भाग म्हणून सीबीआयने वानखेडे यांच्या घरावर आणि दिल्ली, मुंबई, कानपूर आणि रांची या चार शहरांमध्ये इतर 28 ठिकाणी छापे टाकले.

हेही वाचा – समीर वानखेडेंची वादग्रस्त कारकीर्द; SRK, ARYAN, जात प्रमाणपत्र, नवाब मलिकांचे आरोप…

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर समीर वानखेडे यांच्या पथकाने छापा टाकला, त्यानंतर आर्यन खानवर गुन्हा दाखल होण्यास वेळ का लागला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण याबाबतचे कारण आता समोर आले आहे. या प्रकरणी आर्यनची निर्दोष सुटका व्हावी, यासाठी समीर वानखेडेने शाहरूख खानकडे तब्बल 25 कोटी रुपयांची मागणी केली होती, असे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे. सीबीआयकडून या प्रकरणातील वानखेडेच्या विरोधातील आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. (Sameer Wankhede attempt recover extortion by cheating Aryan Khan, CBI will investigate)

सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर या प्रकरणातून आर्यन खानची निर्दोष मुक्तता करण्यासाठी वानखेडेंनी शाहरूखकडे 25 कोटींची मागणी केली होती. पण त्यानंतर मात्र ही रक्कम 25 वरून 18 कोटींवर निश्चित करण्यात आली. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. तसेच या प्रकरणात मध्यस्थी म्हणून केव्ही गोसावी आणि त्याचा सहकारी सॅनविले डिसोझा यांना ठेवण्यात आले होते. तसेच त्यावेळी टोकन म्हणून 50 लाख रुपये देखील घेण्यात आले होते.

समीर वानखेडे यांच्या सांगण्यावरून के.व्ही.गोवासी याने आर्यन खानला एनसीबी अधिकारी म्हणून कार्यालयात ओढत नेले आणि त्याला धमकावले, त्याच्यासोबत सेल्फी काढला. समीर वानखेडे यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाबाबत देखील नीट सांगता आलेले नाही. समीर वानखेडे यांचा एका व्यक्तीसह महागड्या घड्याळांच्या खरेदी-विक्रीत सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे. याबाबत सुद्धा त्यांनी विभागाला कोणतीही माहिती दिलेली नाही.

या अधिकाऱ्यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या विसरून आरोपींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून २९ ठिकाणी छापे टाकले. तर या प्रकरणात आता 18 मे रोजी वानखेडे यांना दिल्लीतील सीबीआयच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.