घरक्राइम'त्या' आरोपांमुळे समीर वानखेडे अडचणीत; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण

‘त्या’ आरोपांमुळे समीर वानखेडे अडचणीत; जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण

Subscribe

सनदी अधिकारी समीर वानखेडे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडलेले आहेत. पण आता आर्यन खान प्रकरणात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सनदी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede case) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडलेले आहेत. पण आता आर्यन खान प्रकरणात त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचे आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रातून वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा – अखेर! लाचखोर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे ३० लाख घेताना अँटीकरप्शनच्या जाळ्यात

- Advertisement -

समीर वानखेडे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर ड्रग्जच्या वादग्रस्त छाप्याचे नेतृत्व केले आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. पण त्याची सुटका करण्यासाठी समीर वानखेडे याने शाहरूखकडे तब्बल 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हाच आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून देखील करण्यात आला होता. पण आता सीबीआयने तपासणी करून वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काय आहेत ‘ते’ आरोप?
मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंनी कार्डीलिया क्रूझवर छापेमारी केली. त्यावेळी फक्त ठराविक लोकांवर कारवाई केली आणि काही जणांना सोडून देण्यात आले. क्रूझवर छापेमारी केल्यानंतर पहिल्यांदा 27 आरोपींची नाव नोंदवण्यात आली. पण, नंतर त्यात दुरुस्ती करून 17 जणांना सोडून देण्यात आलं आणि फक्त 10 जणांची नोंद करण्यात आली, असा पहिला आरोप या आरोपपत्रातून समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -

एनसीबीचे तपास अधिकारी आशिष रंजन हे जेव्हा क्रूझच्या डिपार्चर गेटजवळ तपास करत होते, त्यावेळी संशयित अरबाझ ए. मर्चंट याने मान्य केले होते की, त्याच्या शूजमध्ये चरस लपवलं होतं आणि ते छाप्यानंतर आशिष रंजन यांच्याकडे सुपूर्द केलं होतं. मात्र, अरबाझ ए. मर्चंटचं नाव कागदोपत्री नोंदवण्यात आलेले नाही. शिवाय, इतरही अनेक संशयितांना कुठल्याही नोंदणीविना जाऊ देण्यात आले होते. तर या प्रकरणात अरबाझ याने ज्या सिद्धार्थ शाह याला चरस विकले होते, तो सिद्धार्थ देखील चरसचे सेवन करत होता. असे त्याच्या चॅटमधून स्पष्ट होत असताना देखील एनसीबीच्या मुंबई विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शाहला मोकळं सोडून दिलं.

यानंतर SET ने छाप्यातील एनसीबी अधिकाऱ्यांची चौकशी केल्यानंतर असे समोर आले की, या छाप्यातील आरोपींना स्वतंत्र साक्षीदार के. पी. गोसावीच्या खासगी गाडीतून एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणण्यात आले. के. पी. गोसावी याला आरोपींच्या सोबत ठेवण्यात आले. त्यामुळे गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे दिसून आले. पण एनसीबीचे अधिकारी उपस्थित असतानाही गोसावी आरोपींच्या आजूबाजूला वावरत होता. हा प्रकार स्वतंत्र साक्षीदारासाठीच्या नियमांविरुद्ध आहे. तसेच, के. पी. गोसावी याने आरोपींसोबत सेल्फी फोटो काढले, शिवाय आरोपींचा आवाजही रेकॉर्ड केला, यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

याचवेळी समीर वानखेडे आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी के. पी. गोसावी आणि सॅन्विल डीसोझा यांच्यासोबत मिळून खंडणीचा कट केला. आर्यन खानकडे अंमली पदार्थ सापडले असल्याचा कट रचत त्यावेळी शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली. त्यानंतर 18 कोटींवर या प्रकरणातील तडजोड म्हणजेच सेंटलमेंट करत डील करण्यात आली. ज्यातील 50 लाख रुपये हे गोसावी आणि डिसोजा यांनी आगाऊ रक्कम म्हणून घेतल्याचे आरोपपत्रात लिहिण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, समीर वानखेडे आणि आशिष रंजन हे त्यांच्या जाहीर केलेल्या मालमत्तेचे समाधानकारक पुरावे सादर करू शकले नाहीत, असे SET च्या चौकशीतून नमूद करण्यात आलेले आहेत. तसेच समीर वानखेडे हे त्यांच्या परदेश भेटी आणि या भेटींवर खर्चाचीही नीट आणि समाधानकार माहिती देऊ शकले नाहीत. परदेश भेटींचे स्रोतही त्यांनी नीट सांगितले नाहीत, असेही या आरोपपत्रातून सांगण्यात आले आहे, ज्यामुळे आता समीर वानखेडे हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या आरोपांवरून सीबीआयकडून लवकरच वानखेडे यांची चौकशी देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -