समीर वानखेडे ७० हजाराचा शर्ट तर अडीच लाखांचे बूट वापरतात, नवाब मलिकांचा नवा खुलासा

७० हजरांचे शर्ट घालणारा आणि ५० हजारांची पँट घालणारा यांच्याइतका इमानदार कोणीही नसले

nawab malik gave assurance no comments and post publish against sameer wankhede in court

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत दररोज नवीन खुलासे समोर आणत आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर कोट्यावधींची वसूली केल्याचा आरोप केला आहे. यावेळी नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या इमानदारीवर प्रश्न उपस्थित केला. आजवर  अनेक अधिकारी पाहिले त्यांच्यापैकी एकाचाही शर्ट हजार पाचशे रुपयांपेक्षा महाग नाही. मात्र समीर वानखेडेचे ७० हजारांचा एक शर्ट वापरत असल्याचा नवा खुलासा नवाब मलिक यांनी केला. समीर वानखेडेंनी एकदा घातलेला शर्ट पुन्हा कधीच घातला नाही. त्यांच्या इतका इमानदार अधिकारी आम्ही कुठेही पाहिला नाही. ७० हजरांचे शर्ट घालणारा आणि ५० हजारांची पँट घालणारा यांच्याइतका इमानदार कोणीही नसले,असे टोला यावेळी नवाब मलिक यांनी लगावला.

समीर वानखेडें मुंबईत येताच त्यांनी आपली प्रायव्हेट आर्मी तयार केली आणि या आर्मीच्या मदतीने त्यांनी कोट्यावधींची वसूली केली आहे. याची कसून चौकशी झाली पाहिजे. समीर वानखेडे दुबई आणि मालदीवला गेले होते. तिथे त्यांनी लाखो रुपये खर्च केले. समीर वानखेडे दरदिवशी नवीन कपडे घालतात. त्यांचा एक शर्ट ७० हजारांचा आहे ते तर पंतप्रधान मोदींपेक्षा ही पुढे निघून गेले आहेत. समीर वानखेंडेच्या पँटचा पट्टा २ लाख रुपयांचा तर शुज अडीज लाख रुपयांचे आहेत. तर हातातील घड्याळ २५, ३०, ५० लाखांचे असते. समीर वानखेडेंनी या दिवसात घातलेल्या कपड्यांची किंमतीच १ ते १० करोड रुपये असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले.

एक इमानदार अधिकारी इतके महाग कपडे घालत असेल. त्यांच्या इतका इमानदार कोणीच नाही.  एकदा घातलेला शर्ट पुन्हा कधीच घातला नाही त्यांच्याइतका इमानदार अधिकारी आम्ही कुठेही पाहिला नाही. ७० हजरांचे शर्ट घालणारा आणि ५० हजारांची पतलून घालणारा यांच्याइतका इमानदार कोणीही नसले. समीर वानखेडेंनी हजारो करोडोंची वसूली करुन हे मिळवले आहे त्यांच्या गैरव्यहारांची  चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी नवाब मलिकांनी केली.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले… कोणाच्यात हिंमत