घरमुंबईसमृद्धी महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव!

समृद्धी महामार्गाला आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव!

Subscribe

समृद्धी महामार्गाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला सर्व मंत्र्यांची संमती मिळाली असून त्यावर आता कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपचा विचार होता. मात्र, आता सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नाव देण्याचा विचार केला असून, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मागणी केली आणि त्यांच्या या मागणीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमती देखील देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विकासात असलेले शिवसेनाप्रमुखांचे योगदान लक्षात घेऊन समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीला कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी पाठिंबा दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर त्याच्या कायदेशीर बाबी देखील लवकरात लवकर पूर्ण होतील, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या विकासात अससेले योगदान लक्षात घेत मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे अशी मागणी मी राज्याचा मंत्री म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतून एक्स्प्रेस वे

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा पहिला द्रुतगती महामार्ग आहे जो शिवसेनाप्रमुखांच्या संकल्पनेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई पुणे समृद्धी महामार्ग हा केवळ राज्यातला नव्हे तर देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही राबवत असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग हा देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळे या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव दिले पाहिजे अशी सर्वांची भावना होती. आज या समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली आणि त्याची कार्यवाही पूर्ण होईल असे एकनाथ शिंदे यांनी सागितले. तसेच हा महामार्ग तीन वर्षांच्या आत पूर्ण होईल. जवळजवळ २० ते २२ टक्के काम प्रगतीपथावर आहे. तसेच यामुळे नागपूर मुंबई हे पंधरा तासांचे अतंर आता सहा ते सात तासांत कापता येईल, असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.


Video – पाहा काय म्हणाले एकनाथ शिंदे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -