संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर, नितीन सरदेसाईंचा सरकारला इशारा

विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनीह सहभाग दर्शवलाय.

Sandeep Deshpande Attack Update
विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनीह सहभाग दर्शवलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात होता. सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला झाला झाला होता. मात्र या प्रकरणी मनसेने आक्रमक पवित्रा घेत कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मूक मोर्चा काढलाय. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये मनसे कार्यकर्त्यांसह नागरिकांनीह सहभाग दर्शवलाय.

मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात एका राजकीय नेत्यावर हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मनसे आक्रमक पाऊल उचल्याचं दिसून आलं आहे. या हल्ला प्रकरणी मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत शिवाजी पार्क परिसरात मूक मोर्चा काढला. शिवाजी पार्क परिसरातल्या सेल्फी पॉइंट येथून या मूक मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केलाय. दादर फ्रेंड्स ग्रूपच्या वतीने हा मूक मोर्चा काढण्यात आलाय.

या मूक मोर्चामध्ये मनसे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित होते. “संदीप देशपांडे यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे. राजकीय सूड भावनेतून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत हे लोकशाहीला काळिमा फासणारं आहे. शिवाजी पार्क नाही तर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये देखील संतापाची लाट आहे”, असं सरदेसाई म्हणाले.

जे कुणी आरोपी पकडले गेले आहेत असं सांगत आहेत त्यापेक्षा अधिक लोक यामागं होती. देशपांडे यांच्यावरील सूत्रधारांना पकडणं आवश्यक आहे. या प्रकरणाचा तपास सूत्रधारांपर्यंत पोहोचला नाही तर महाराष्ट्र सैनिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते, असं नितीन सरदेसाई म्हणाले. तसंच लोकशाहीत कुणी कुणाची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढतात म्हणून त्यांच्यावर हल्ला करणं योग्य नाही. या प्रकरणाच्या सूत्रधारांपर्यंत तपास गेला नाही तर मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असं नितीन सरदेसाई म्हणाले.