घरCORONA UPDATE'आधी वसुली बार मालकांकडून... आता वसुली व्यापाऱ्यांकडून', संदीप देशपांडेंची राज्य सरकारवर गंभीर...

‘आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून’, संदीप देशपांडेंची राज्य सरकारवर गंभीर टीका

Subscribe

देशपांडे यांनी सरकारवर वसुलीचे आरोप केले आहेत.

राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दुकाने, आस्थापने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र मुंबईतील काही भागात सायंकाळी ४ नंतरही काही दुकाने खुलेआम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. आधी वसुली बार मालकांकडून…. आता वसुली व्यापाऱ्यांकडून अशा शब्दांत देशपांडे यांनी सरकारवर वसुलीचे आरोप केले आहेत.

संदीप देशपांडे यांनी दादर स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ ट्वीट करत सरकावर टीका केली आहे. ”आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून…! मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू…..सायंकाळी चार नंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान ५०००, मध्यम दुकान २०००, छोटे दुकान १००० वसुलीचे नवे रेट कार्ड….. असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील दुकाने ५ जूनपासून सम-विषम फॉर्म्युल्यानुसार उघडण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील दुकाने सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाहीये. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांना आता सम-विषम फॉर्म्युल्यानुसार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने दुकानदारांना नियमांचे पालन करणे अनिवार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कपडे व्यापारी, भांड्यांची दुकानांसह इतरही दुकाने उघडण्यात आली आहेत. सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू करु शकतात. असे असतानाही दादर परिसरातील बहुतांश दुकाने सरकारी नियमांना बगल देत सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे.


प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या रजेवर, रेखा ठाकूर यांच्याकडे वंचितचे प्रभारी अध्यक्ष पद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -