घरमुंबईनालेसफाईच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा; संदीप देशपांडे यांची मागणी

नालेसफाईच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावा; संदीप देशपांडे यांची मागणी

Subscribe

मनसे नेते संदीप देशपांडे नालेसफाईवरुन सातत्याने शिवसेनेवर टीकास्त्र डागत आहेत. गुरुवारी पत्रकार परिषद घेत व्हिडिओद्वारे मुंबईतील नालेसफाईची पोलखोल केली होती. देशपांडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून नालेसफाईचा केवळ दिखावा कसा केला जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा त्यांनी ज्या ठिकाणी नालेसफाई होत आहे, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची मागणी केली आहे.

संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “जिथे नालेसफाई होते तिथे जर CCTV कॅमेरे लावले तर दूध का दूध आणि पानी का पानी होईल,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

व्हिडिओद्वारे मुंबईतील नालेसफाईची पोलखोल

संदीप देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन साकीनाका, दूधवाला बिल्डींग येथे नालेसफाईचा केवळ दिखावा कसा केला जातोय हे व्हिडिओद्वारे समोर आणलं. साकीनाका येथील नालेसफाईचा व्हिडिओ दाखवत नाल्यातील गाळ नाही तर डेब्रिजची वाहतूक कंत्राटदारांनी केली असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेत जे विरप्पन बसले आहेत, त्यांच्यावर करवाई करण्याची हिंमत महापौर यांनी दाखवावी. मुंबई महापालिकेतील विरप्पन गँगची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -