घरमुंबईमुंबईतल्या बाप्पालाही सांगली- कोल्हापूरच्या पुराचा फटका!

मुंबईतल्या बाप्पालाही सांगली- कोल्हापूरच्या पुराचा फटका!

Subscribe

आज घराघरात गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. गेले आठवडाभर जागोजागी बाजारपेठा मखर,सजावटीच्या सामानांनी सजल्या होत्या. फुल मार्कककेटमध्ये ग्राहकांची लगबग सुरू होती. पण असे असले तरी सांगली-कोल्हापूरला आलेला पूरचा फटका गणपतीबाप्पालाही बसला आहे.

- Advertisement -

यंदा पूरपरिस्थितीमुळे फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फुलांचा बाजार चांगलाच महागला आहे. झंडूचा दराने शंभरी पार केली आहे. तर काही ठिकाणी दोनशे रूपये किलोने झेंडू विकला जातोय. त्यामुळे ग्राहक नाखूष आहेत. दरवर्षी दोन-दोन किलो झेंडीची फुलं घेणाऱ्या ग्राहकांनी अर्धा ते एक क्लो झेंडू घेण्यावरच समाधान मानलं आहे.

दरवर्षी मी जास्वंदीच्या फुलांचा हार गणपतीला वाहते. पण यावर्षी पुलं महाग झाल्यामुळे जास्वंदीच्या फुलांचा हार न करता केवळ दररोज एक बाप्पाला वाहणाऱ्यावर समाधान मानावं लागणार आहे.

– शामल जोशी, ग्राहक

तर केवळ फुलच नाही तर मखर,सजावटीचे सामान विकत घेण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसत नाही. शनिवार-रविवारी बाजारपेठांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसायची पण ऐन गणपती मात्र बाजारपेठा रिकाम्याच राहिल्या.

dadar market

दरवर्षी आम्ही मखराचा स्टॉल लावतो. यावर्षी खास इको फ्रेंडली मखर आमच्याकडे आहेत. पण म्हमावा तसा प्रतिसाद ग्राहकांचा मिळाला नाही. आमचा खर्च निघाला नाही. काल आदल्या दिवशीपर्यंत आम्हाला आशा होती. पण यावर्षी आमचे नुकसानच झाले आहे.

– विक्रेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -