घरमनोरंजन'KGF 2' मध्ये दिसणार रविना-संजय दत्तची जोडी

‘KGF 2’ मध्ये दिसणार रविना-संजय दत्तची जोडी

Subscribe

'एलओसी कारगिल' चित्रपटाद्वारे एकत्र दिसलेली रविना-संजयची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

अभिनेता यश अभिनीत ‘केजीएफ’ या कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तुफान केल्यावर लवकरच त्या चित्रपटाचा सिक्वेल येण्याची चर्चा रंगली. त्यानुसार अभिनेत्री रविना टंडन आणि अभिनेता संजय दत्त ही जोडी ‘केजीएफ २’ निमित्त पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रविना टंडन दिसणार इंदिरा गांधींच्या भूमिकेत

याआधी मिळालेल्या माहितीनुसार, ‘केजीएफ २’ मध्ये अभिनेत्री रविना टंडन आणि अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता डेली क्रोनिकलने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटासाठी रविना टंडनचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री रविना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. डेक्कन क्रोनिकलच्या माहितीनुसार चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून केजीएफचा सिक्वेल मोठा असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

संजय दत्त साकारणार ‘या’ डॉनची भूमिका

तसेच चित्रपटातील अभिनेता संजय दत्तच्या सहभागाविषयी बोलायचे तर या चित्रपटात संजय दत्तची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच या चित्रपटात संजय दत्त दुबईतील कुख्यात डॉन इनायतची भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे डेक्कन क्रोनिकलने दिलेली माहिती खरी ठरल्यास ‘केजीएफ २’ च्या निमित्ताने रविना-संजय ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. यापूर्वी ही जोडी २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटात झळकली होती.’ केजीएफ २’ चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले असून या वर्षाअंती हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -