आमचा कोणावरही संशय नाही, पूजा चव्हाणच्या पालकांनी नोंदवला जबाब

Pooja Chavan Suicide Case Sanjay Rathore's car is in the ministry, but the minister is not reachable

काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वनवडी भागात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पूजाच्या आत्महत्येचा संबंध शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याशी जोडण्यात आला होता. यामुळे आलेल्या राजकीय दबावामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण आता पूजाच्या आईवडिलांनी तिच्या मृत्यूप्रकरणी आमचा कोणावरही संशय नसल्याचा जबाब पोलिसात नोंदवला आहे. यामुळे याप्रकरणामुळे अडचणीत आलेले संजय राठोड यांना एक प्रकारे क्लिन चीटच मिळाली आहे.

दरम्यान , जरी पूजाच्या आईवडिलांनी त्यांची कोणाविरोधात तक्रार नसल्याचे व कोणावरही संशय नसल्याचे सांगितले असले तरी याप्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.