घरमुंबईसंजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल कोश्यारींकडून मंजूर

संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल कोश्यारींकडून मंजूर

Subscribe

रवींद्र वायकर , सुनील प्रभू यांची नव्या वनमंत्री पदासाठी चर्चेत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी राठोड यांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही करून तो गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आला. राज्यपालांनी त्वरीत त्यावर स्वाक्षरी करून तो मंजूर केला आहे.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात आली होती. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता.

- Advertisement -

राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असे म्हणता येणार नसल्याचे सांगत राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत, असेही त्यांनी विचारले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -