खासदार संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल

sanjay raut
संजय राऊत

शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होणार आहेत. राऊत यांनी डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेतली होती. त्या वेळेनुसार राऊत रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. जलील सरकार यांच्या टीमच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तिथे त्यांच्यावर अॅन्जीओग्राफी होणार असल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळत आहे.

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज माध्यमांसमोर शिवसेनेची भूमिका मांडत होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊत प्रचंड कामात व्यस्त आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडणे, पक्ष श्रेष्ठींसोबतच्या आणि आमदारांसोबतच्या बैठक्या या सर्व घडामोडींमुळे संजय राऊत यांचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. काही दिवसांपासून त्यांच्या छातीत दुखत आहे. त्यामुळे त्यांनी आज डॉक्टरांची अपॉईमेंट घेतली होती. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.