घरमुंबईमहाराष्ट्राने बुलेट ट्रेन नाकारली, म्हणून शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार - संजय...

महाराष्ट्राने बुलेट ट्रेन नाकारली, म्हणून शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार – संजय राऊत

Subscribe

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारामध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. भारतात बुलेट ट्रेनचा प्रकल्प दिल्यासाठीच हा पुरस्कार देण्यात आला असावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातून यंदा फक्त सहा जणांनाच पद्म पुरस्कारासाठी निवडल्याबाबत त्यांनी मोदी सरकारची टीका केली आहे. राज्यातील १० ते १२ जणांना पद्म पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. पण यंदा अवघ्या सहा जणांचीच निवड महाराष्ट्रातून झाली असल्याचे राऊत यांनी म्हटेल आहे. महाराष्ट्र मोठे राज्य असून त्यामध्ये अनेक लोक विविध प्रकारचे काम करतात. पण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पद्म पुरस्कार पाहता त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांच मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार हा केवळ बुलेट ट्रेन दिल्यासाठीच मिळाला असावा असे राऊत म्हणाले. कदाचित महाराष्ट्राने बुलेट ट्रेन नाकारली म्हणूनच हा पुरस्कार त्यांना देण्यात आला असावा असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातून ज्या सहा जणांना पुरस्कार दिले गेले त्यांची नावे ही यादीत होती की नाही हे तपासाव लागेल असे राऊत म्हणाले. राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेल्यांपैकी एकाचेही नाव पद्म पुरस्कारात नसेल असे राऊत म्हणाले. त्यामुळेच महाराष्ट्रातून पुरस्कार मिळालेल्यांची नावे कशी आली याची तपासणी करावी लागेल असे राऊत म्हणाले. ठाकरे सरकारकडून पद्म पुरस्कारासाठी केंद्राकडे ९८ मान्यवरांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याही नावाची शिफारस होती. तसेच सिरमचे अदर पूनावाला, जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सुबोध भावे यांच्या नावांचीही शिफारस करण्यात आली आहे. पण यापैकी केवळ एकाच व्यक्तीची निवड झाली आहे. उर्वरीत ९८ नावे मात्र आता प्रतिक्षा यादीतच राहिली असे राऊत म्हणाले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -