चक्रीवादळापेक्षा देशातील कोरोनाचे वादळ थांबवा, राऊतांची केंद्र सरकारवर टीका

चक्रीवादळापेक्षा कोरोनाचे वादळ भयंकर आहे. त्यामुळे ते आधी थांबवा, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला डिवचले आहे.

sanjay raut slams bjp over migrants in maharashtra
भाजप मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील, संजय राऊतांचे रोखठोक वक्तव्य

“चक्रीवादळापेक्षाही देशात कोरोनाचे वादळ निर्माण झाले आहे ते थांबवणे फार गरजेचे आहे. कोरोनाच्या वादळाने दररोज मृत्यूच्या राशी पडत आहेत. त्यामुळे सर्वांन मोठे संकट आहे ते म्हणजे कोरोनाच्या वादळाचे. कारण हे संकट तुफान आहे. ते आधी थांबवा. त्यासाठी काम करा”, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. “चक्रीवादळापेक्षाही देशात असलेले कोरोना वादळ फार गंभीर आहे. अनेकांचे मृत्यू होत आहेत. दररोज दुखद बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे मन निराश होत आहे. त्यामुळे या कोरोना वादळाचे काय करणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, त्यांनी लसीकरणाबाबत भाष्य करताना म्हणाले की लसीकरणाबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चर्चा सुरु आहेत. लवकरच त्यातून मार्गही निघेल”.

फोन टॅपिंगबाबत राऊत म्हणाले…

“देशामध्ये कोणाचे फोन टॅपिंग होत नाहीत हे मला सांगा. आमचे देखील होतात आणि आताही होत असतील. त्यामुळे हा राजनैतिक मामला झाला आहे. आम्ही त्याला गंभीरतेने घेत नाही. फोन टॅपिंग हे विरोधकांना ब्लॅकमेल करण्याचे एक हत्यार आहे. त्यामुळे मी नाना पटोले यांना देखील हेच सांगेन की, घाबरु नका. फोन टॅपिंग होणे म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. त्याचबरोबर प्रत्येकाला त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य असते. त्यामुळे कोणीही वैयक्तिक आयुष्यात लुडबुड करु शकत नाही”, असे भाष्य संजय राऊत यांनी फोन टॅपिंगवर केले.


हेही वाचा – Tauktae Cyclone : उत्तरेच्या दिशेने २४ तासात वेगाने सरकणार चक्रीवादळ, १७ मे रोजी गुजरातला धडकणार