राज ठाकरेंना काऊंसिलिंग आणि उपचाराची गरज, संजय राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut criticized the Agneepath scheme

पुण्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाही सभा पारपडली. राज ठाकेरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेनेला टार्गेट केले. याला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले. यावेळी राज ठाकरेंना निराशेने ग्रासले की ते असे बोलतात. इतर दुकाने चालली नाहीत म्हणून सोयीनुसार ते हे करत आहेत. राज ठाकरे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वैगरे बोलत आहेत. पण ह्यांनी हिंदुत्वाची शाल कधी पांघरली? आमच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. त्यांना काउंसलिंगची आणि उपचाराची गरज आहे, असा असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

हेही वाचा – राज ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना टोला

क्रेडिबिलिटी आणि संभाजी नगर –

त्यांनी शिवसेनेच्या आणि बाळासाहेबाच्या क्रेडिबिलिटीवर बोलूनये. बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी काय हे महाराष्ट्र आणि देश जाणून आहे. त्यांनी स्व:ता विषयी बोलावे. त्यांनी स्वत:च्या पक्षा विषयी बोलावे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात 50 वर्षांपासून काम करत आहे. त्यांच्या भाषेत क्रेडिबिलिटी आहे. म्हणून हा पक्ष 50 वर्ष टिकून आहे. संभाजी नगर झालेच पाहीजे. आणि ते आम्ही केले आहे. म्हणूनच राज ठाकेर संभाजी नगर म्हणातात. त्यांनी संभाजी नगर हा उच्चार बाळासाहेब ठाकरेंमुळेच केला आहे. केंद्राकडे हा प्रस्ताव आहे. ते मंजूर करतील .

हिंदुत्व –

आमच्या हिंदुत्वाला ढोगी वैग्यारे म्हणाऱ्यांनी आपण हिंदुत्वाची शाल कधी पांगरली, त्यांचा खूलासा करावा. आमची पक पक बग बग जे काही असेल ते असेल. आमचे हिदुत्व प्रखर राष्ट्रवादी आहे. आमच्या हिंदुत्वा विषयी कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. तूमची हिदुत्वा विषयी काय भूमीका होती. काल आणि आज पक पक वाली होती? बग बगवाली होती? का आनखी कसली होती. आम्हाला त्यावर आता काय बोलायचे नाही. आमचे हिंदुत्व आमच्याकडे आहे. ते हिंदुत्व तेजाने तळपते आहे.

राज ठाकरेंचा दौरा –

राज ठाकरेंच्या दौऱ्याला महाराष्ट्रात रसद पुरवली गेली म्हणजे काय असते. महाराष्ट्रात भाजप तुमच्या पाठीशी तीकडे भाजपचे राज्य तुम्हाल कोणी रोखले आहे. उत्तर प्रेदशमद्ये कोण तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

हेही वाचा –  राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात महाराष्ट्रातील भाजपनेच ट्रॅप रचला, सचिन सावतांची प्रतिक्रिया

औरंगजेबाची कबर तोडून टाका –

तसेच राज्यात अकबरुद्दीन ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवून गेल्यापासून त्यावरूनही राजकारण तापलं आहे. राज ठाकरे यांनी सभेतून यावरून सरकारवर हल्लाबोल चढवला त्यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. औरंगजेबाची कबर आज आहे का? आमच्य़ा सरकारला दोन वर्ष झाली. औरंगदेबची कबर जी आहे ती केद्रं सरकारच्या हातामध्ये आहे, तोडून टाका ना, असेही राऊत म्हणाले, तसेच राज ठाकरे हे नवे एमआयएम आहेत. हिंदूत्ववादी ओवैसी आणि ते हैदराबादचे औवेसी हे सेम आहेत, असा टोला राऊतांनी पुन्हा लगावला आहे.

यांना उपचाराची गरज –
राज ठाकरे निराशेने ग्रासले की असे बोलतात इतर दुकानं चालली नाही म्हणून सोयीनुसार हे करत आहेत. राज ठाकरे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वैगरे बोलणार. ह्यांनी शाल कधी पांघरली? आमच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. त्यांना काउंसलिंगची गरज आहे उपचाराची गरज आहे, असेही राऊत म्हणाले.