घरताज्या घडामोडीकंगना, गुप्तेश्वर पांडे हे फार मोठं षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप!

कंगना, गुप्तेश्वर पांडे हे फार मोठं षडयंत्र, संजय राऊतांचा आरोप!

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून बॉलिवुडमधलं कंगना रनौत (Kangana Ranaut) हे नाव बरंच चर्चेत आलं आहे. कंगना रनौतच्या मुंबईबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद कंगना विरुद्ध शिवसेना असा झाला. आणि आता या वादाला कंगना विरुद्ध संजय राऊत (Sanjay Raut) असं स्वरूप आलं आहे. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं असून त्यामध्ये संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यासाठी न्यायालयानं कंगनाला परवानगी दिली आहे. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सामनामध्ये ‘उखाड दिया’, अशा मथळ्याखाली वृत्त देण्यात आलं होतं. त्याच संदर्भात कंगनानं संजय राऊत यांना देखील या प्रकरणात प्रतिवादी केलं आहे. त्यावर बोलताना ‘कंगनानं टीका करणं, बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी टीका करणं हे महाराष्ट्राविरुद्ध मोठं षडयंत्र आहे’, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.

काय म्हणाले संजय राऊत?

‘मला प्रतिवादी करणं हे हास्यास्पद आहे. पण आपण न्यायालयाचा नेहमी मान राखतो तसा आत्ताही राखला जाईल. बेकायदेशीर बांधकाम तोडण्याचा पालिकेला अधिकार आहे. ते तोडलं म्हणून कांगावा करायचा आणि मला त्यात ओढून राजकारण करण्याचा हा प्रकार आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. फार मोठं षडयंत्र आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे (Bihar DGP Gupteshwar Pandey) गेल्या २ महिन्यांपासून महाराष्ट्राला बदनाम करत होते. काल त्यांनी राजीनामा दिला आणि ते आता राजकीय पक्षात जातील. याआधी देखील त्यांनी एकदा राजीनामा दिला होता’, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

‘मला कोर्ट-कचेऱ्या नवीन नाहीत’

दरम्यान, कंगनानं प्रतिवादी केल्यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही आंदोलनाच्या मुशीतून घडलेलो आहोत. मझ्यावर १६० खटले चालू होते. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या कोर्टात माझ्याविरूद्ध केस पडलेली आहे. कोर्टातली लढाई माझ्यासाठी नवीन नाही. कोर्ट कचेऱ्या होतच असतात’, असं ते म्हणाले. तसेच, ‘ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) किंवा असे तपास गुप्तपणे करावे लागतात. ही फक्त बॉलिवुडची (Bollywood) किंवा मुंबईची नाही तर देशाची समस्या आहे. एनसीबीनं देशभरात जाऊन त्याचा तपास करायला हवा’, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -