घरमुंबईमहाराष्ट्रात भोग्यांच्या विषयावर आंदोलन करावे अशी परिस्थिती बिघडलेली नाही - संजय राऊत

महाराष्ट्रात भोग्यांच्या विषयावर आंदोलन करावे अशी परिस्थिती बिघडलेली नाही – संजय राऊत

Subscribe

महाराष्ट्रात भोग्याबाबत कोठे ही उल्लघन झालेले नाही. मग हे आंदोलन कशा करता कोणी आंदोलनाची हाक दिली हे मला माहीत नाही. संपूर्ण देशात सर्वोच्च न्यायालयाने जे नीयम घालून दिले आहेत. त्यानुसार राज्यात काम केले जाते. त्या पलीकडे जर कोणी काम करत असेल तर सरकार संक्षम आहे.

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांबाबत भूमीका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांची बैठक झाली. यावेळी मी तीथे होते. मुंबईत मशीदींवरील सर्व भोंगे परवानगीने उभारलेले असून सर्वांनी नीयमांचे पालन करण्याचे मान्य केले असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात भोग्याबाबत कोठे ही उल्लघन झालेले नाही. मग हे आंदोलन कशा करता कोणी आंदोलनाची हाक दिली हे मला माहीत नाही. संपूर्ण देशात सर्वोच्च न्यायालयाने जे नीयम घालून दिले आहेत. त्यानुसार राज्यात काम केले जाते. त्या पलीकडे जर कोणी काम करत असेल तर सरकार संक्षम आहे. ज्या विषयावर गृहमंत्री किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायचे आहे. त्यावर मी उत्तर देण बरोबर नाही. पण मी शिवसेनेचा नेता म्हणून सांगेन की मुंबईत आणि महाराष्ट्रात भोग्यांच्या विषयावर आंदोलन करावे अशी परिस्थिती बीघडलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

काल मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मी मुख्यमंत्र्याकडे होते. त्यावेळी मुंबईतील मशीदींवरच्या भोंग्याची परवानगी सर्वानी घेतली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे मान्य केले आहे. हाच नियम  इतर धार्मीक स्थळांना आहे. प्रत्येकाने या नियमांचे पालन केले तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. जर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जात नसेल तर समान नागरी कायद्याची भाषा कशाला करायची. समान नागरी कायदा व्हावा यासाठी आमच्यासारखे लोक मागणी करत आहेत. याचा अर्थ तोच आहे की प्रत्येकाने धर्माच्या पुढे जाऊन कायद्याचे पालन करायचे आहे. धर्माच्या वर न्यायालय आहे. कायदा आहे. आम्ही कायद्याचे पालन करतोय इतर लोक पालन करतात. हे करत असताना कोणी चीथावणीची भाषा करत असेल तर ते समान नागरी कायद्याचे उल्लघन आहे. राज्यात आणि देशात अशा प्रकारे कोणी चीथावणीची भाषा करत असेल आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी केंद्रात सत्तेत बसलेला पक्ष चीथावणी देत असले तर प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी याची नोंद घेतली पाहीजे, असेही संजय राऊत म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -