घरमुंबईशेंडी ठेवली म्हणजे हिंदूत्व नाही ... - संजय राऊत

शेंडी ठेवली म्हणजे हिंदूत्व नाही … – संजय राऊत

Subscribe

शिवसेना नेते संजय राऊत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे. त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध शायर काजी नजरुल इस्लाम यांचा एक शेर ट्विट करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांचे ट्विट –

- Advertisement -

मै हिंदुओं और मुसलमानों को, बर्दाश्त कर सकता हूँ, लेकिन चोटीवालों और दाढीवालों को नहीं! चोटी हिंदुत्व नही है, दाढी इस्लाम नही है, असा शेर राऊत यांनी शेअर केला आहे. मी हिंदू आणि मुस्लिमांना सहन करू शकतो. पण शेंडी आणि दाढी राखणाऱ्या कट्टरतावाद्यांना सहन करू शकत नाही. कारण शेंडी ठेवली म्हणजे हिंदू ठरत नाही आणि दाढी ठेवली म्हणजे इस्लामी झाले असे होत नाही, असा संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटचा अर्थ आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व –

- Advertisement -

शिवसेना प्रमुख, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची साधी आणि सोपी व्याख्या केली होती. यात माझे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. मंदिरात घंटा बडवणारे हिंदू नकोत. अतिरेक्यांचा खात्मा करणारे हिंदू मला हवे आहेत, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांनी हिंदुत्वाचा संबंध राष्ट्रीयत्वाशी जोडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात हा दाखला देत भाजपची कोंडी करत असतात.

 

उद्धव ठाकरेंची टीका –

आपले हिंदुत्व गदाधारी तर इतरांची घंटा धारी. बसवा हलवत घंटा, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करताना शिवसेनेचे हिंदुत्व गधाधारी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तरही दिले होते. आमचे हिंदुत्व गधाधारी असे फडणवीस म्हणाले. तो गधा आम्ही अडीच वर्षापूर्वी सोडून दिला. आम्ही गाढव सोडून दिले. घोड्याच्या आवेशात होते, त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वीच आम्ही सोडून दिले, अशी टीका केली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -