घरताज्या घडामोडीधर्मांधता, जातीयता दूर ठेवून राजकारण करण्याचा आदर्श अटलजींनी ठेवला - संजय राऊत

धर्मांधता, जातीयता दूर ठेवून राजकारण करण्याचा आदर्श अटलजींनी ठेवला – संजय राऊत

Subscribe

अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे नाते

आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जंयती आहे. यानिमित्ताने देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृर्तींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली. देशाचे नेतृत्व कसे असले पाहिजे हे अटल बिहारी वाजपेयींकडे पाहून कळते. धर्माधता आणि जातीयता दूर ठेवून राजकारण करता येते हा आदर्श अटल बिहारी वाजपेयी यांनी देशासमोर आणि सर्व राजकीय पक्षासमोर ठेवला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

अटल बिहारी वाजपेयी लोकप्रिय नेते होते. विरोधी पक्षात राहूनही आपल्या विचारधारेशी ते नेहमी एकनिष्ठ होते. माणूसकी काय असते हे आम्ही त्यांच्याकडून पाहिली आहे. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परिपाठ त्यांच्याकडून शिकलो आहे. हिंदूत्वतेच्या विचारधारेशी तडतोड न करता देशातील एकात्मता टिकली पाहिजे यावर भर देऊन त्यांनी राजकारण केले. धर्माधता जातीयता या दोन शब्दांना दूर ठेवून हिंदूत्वाचे राजकारण करता येते हे त्यांनी देशाला दाखवून दिले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisement -

अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे नाते

हिंदूत्वाच्या विचारधारेशी तडजोड न करता वाजपेयींनी देशाची एकत्मता टिकवली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते, असे संजय राऊत म्हणाले. देशात एसडीएचे सरकार असताना देशाचे पंतप्रधान असताना ते अनेक वेळा बाळासाहेबांशी अनेक विषयावर चर्चा करत होते. त्यांच्यात सल्लामसलत होत असत. भाजप आणि शिवसेनेच्या युतीत वाजपेयींचे महत्त्वाचे योगदान असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले.

नेहरुंनंतर देशाचे एकमेव नेते वाजपेयी होते

अटल बिहारी वाजपेयी पंडित नेहरुंच्या काळापासून संसदेत कार्यरत होते. पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान होते तेव्हापासून वाजपेयी राजकारणार सक्रीय आहेत. अटलबिहारी हे संपूर्ण देशाचे नेते होते. कोणत्याही पक्षाचे किंवा विचारधारेवर चालणारे अटलबिहारी नव्हते. अडवाणी आणि वाजपेयी हे भाजपचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. वाजपेयींचे स्मरण आम्हाला कायम राहिल. सलोख्याने पाकिस्तानचा प्रश्न सोडवता येईल का यासाठी त्यांनी सगळ्या मार्गाचा अवलंब केला मात्र काहीच होत नाही तेव्हा त्यांनी कारगील युद्धात भारताची शौर्याची भूमिका बजावली. पंडित नेहरुनंतर अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव नेते होते. देश सर्वाचा असून राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय स्वाभिमान जपणारे मार्गदर्शक आणि विचार प्रवाही अटल बिहारी वाजपेयी होते, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अमोल इगे हत्येप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होणार – सतेज पाटील

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -