घरमुंबई"त्यांना केवळ कागदावरची शिवसेना मिळाली..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

“त्यांना केवळ कागदावरची शिवसेना मिळाली…”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Subscribe

माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये पहिली सभा होणार आहे. “संपूर्ण महाराष्ट्रात शिवगर्जना होतेय, त्यांना केवळ कागदावरची शिवसेना मिळाली आहे, ती फक्त कागदावरच राहील”, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय.

शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या यात्रांचं आयोजन केलं जात आहे. आदित्य ठाकरेंनी मुंबईत निष्ठा यात्रा काढली, तर महाराष्ट्रात शिव संवाद यात्रा. त्याचबरोबर ठाकरे गटातील नेत्यांची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यातच आता ठाकरेंनी शिवगर्जना यात्रा सुरू केली आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ज्यांना पळून जायचं होतं ते पळून गेले. आता जे आहेत ते निष्ठावंत आहेत. निघून गेलेल्यांमुळे आम्हाला काही फरक पडला नाही. नाव आणि चिन्ह मिळवलंत, पण जनतेचं प्रेम मिळणार नाही. त्यांना केवळ कागदावरची शिवसेना मिळाली आहे आणि ती कायम कागदावरच राहीलं.” यापुढे बोलताना संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “जरी कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं आहे, पण शिवसेनेचा वारसा आणि जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपच्या आशीर्वाद यात्रेचा आणि पैशांच्या जोरावर यात्रेत सामील करून घेणारे कार्यकर्ते याचा काही उपयोग होणार नाही.”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या आजच्या खेडमधील सभेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आतापर्यंत कोकण शिवसेनेचा पाठीराखा बनून राहिला आहे. संकटकाळी कोकणाने शिवसेनेला साथ दिली आहे. खेडच्या सभेसाठी उद्धव ठाकरे थोड्याच वेळात निघणार आहेत. खेडची सभा अतिविराट होईल. उद्धव ठाकरेंची पुढली सभा मालेगावात होणार आहे.”

- Advertisement -

कश्मीरी पंडीतांची हत्या सुरू आहे . त्यांचा आजही आक्रोश सुरू आहे. भाजपचा एकही नेता गेला नाही, भाजपने काश्मिरी पंडितांचा फक्त राजकारणासाठी वापर केला आहे, असा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केलाय. तसंच “पंजाबमध्ये पुन्हा खलिस्तानचं भूत जागं झालंय. खलिस्तान्यांची जबाबदारी केवळ राज्य सरकारवर टाकून चालणार नाही, केंद्राचीही ही जबाबदारी तेव्हढीच आहे” असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -