आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है- अमृता फडणवीसांचे राऊतांवर टि्वट

भाजप नेत्यांनी राऊत यांच्या या खुलाशावर निशाणा साधला आहे. यात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी टि्वट केले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांसह तपास यंत्रणाना लक्ष्य केलं. यावेळी राऊत यांनी भाजप नेत्यांनी आपल्याला सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर टाईट करू अशा धमक्या दिल्याचा आरोप करत खळबळ उडवली. त्यानंतर भाजप नेत्यांनीही राऊत यांच्या या खुलाशावर निशाणा साधला आहे. यात सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांनी टि्वट केले. आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है असे टि्वट करत अमृता यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली.

तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे म्हटले आहे. किरीट सोमय्यांविरोधात राऊतांनी वाईट शब्द वापरले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लाड यांनी केली असून. संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा अशी झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

तर नितेश राणे यांनीही राऊतांवर शेलक्या शब्दात टि्वट केले आहे.