घरताज्या घडामोडी'केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो'

‘केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो’

Subscribe

आम्ही केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो', असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला लगावला आहे.

‘मुंबईशी संबंध नसलेल्या एैऱ्यागैऱ्यांनी वक्तव्य करु नये. महत्त्वाचे म्हणजे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो’, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला लगावला आहे. सामना कार्यालयात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

‘माझ नाव घेऊन कोणाला पब्लिसिटी स्टंट करायाचा असेल तर त्यांनी खुशाल करावा. पण, मुंबई तुम्हाला पोसत आहे. हे शहर तुम्हाला सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो’, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

- Advertisement -

मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात

पुढे ते म्हणाले की, ‘मुंबई विषयी काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावले उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत. त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मतदान केले आहे का? मुंबई पोलीस हे पाकिस्तानचे पोलीस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचं संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल करतानाच झाशीची राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे. ड्रग्सच्या गुळण्या करून आणि नशेच्या अंमलात कुणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल आणि अशा व्यक्तिला कोणी पाठिंबा देत असेल तर देशाचे राष्ट्रीयत्व किती खालच्या पातळीवर गेले हे दिसून येते, असेही ते म्हणाले.

तसेच झाशीच्या राणीशी कुणाची तुलना करणे हा झाशीच्या राणीचा घोर अपमान आहे. आधी शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि आता झाशीच्या राणीचा अपमान करत आहेत. झाशीच्या राणीचा अपमान करणाऱ्या कोणत्या हिंदुत्वाच्या गप्पा मारत आहेत, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -