घरमुंबईसंजय राऊत यांनी आपल्या उंची एवढेच बोलावे; आशिष शेलारांचा इशारा

संजय राऊत यांनी आपल्या उंची एवढेच बोलावे; आशिष शेलारांचा इशारा

Subscribe

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन विधानसभा अध्यक्षांनी करावे, नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवायला लागेल, असे विधान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. या विधानाला मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी संजत राऊत यांना इशारा दिला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, दाखवा म्हणजे काय, भांडुपमधला संजय राऊत यांचा बंगला आहे का दाखवायला. दाखवायची भाषा राऊतांनी करू नये. राज्य लोकशाही मूल्यांवर, भारतीय संविधानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाच्या आधारावर चालते. त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि लोकशाहीमध्ये अशा धमक्यांना स्थान नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी मर्यादेत राहावे आणि आपल्या उंची एवढेच बोलावे, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय राऊत?
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. ते तिकडे शिवसेनेतून उरलेले आमदार कसे अपात्र होतील याविषयी प्रवचन करत आहेत. परंतु नार्वेकरांचा पक्षांतरचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद असून पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे एवढेच त्यांना सांगतो आहोत. नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवायला लागेल. ही धमकी नाही आहे. नाहीतर परत ते म्हणतील आम्ही धमकी दिली. कायद्याचे पालन करा हे आम्ही सांगत आहोत. परंतु पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याची हत्या करत आहात आणि ती आम्ही होऊ देणार नाही, असे सज्जड दम संजय राऊत यांनी नार्वेकरांना दिला.

ब्रिटीशांचा कायदा लागू होत नाही
शिवसेनेचे 16 आमदार सुद्धा आमच्या अख्यारित येतील आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करू वगैरे वगैरे हे जे काही चाललं आहे त्या भुलथापा बंद करा आणि आपण खरोखरच वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा. तुम्ही म्हणता आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावे लागतात आणि वेळेचं बंधन असतं. तुम्ही असे कोण लॉर्ड फॉकलंड लागून गेले आहात. इथे ब्रिटीशांचा कायदा लागू होत नाही. हे भारतीय संविधान आहे लक्षात घ्या, असे संजय राऊत नार्वेकरांना उद्देशून म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -