घरताज्या घडामोडीपत्नीला EDची नोटीस आल्यानंतर राऊतांचं ट्विट, म्हणाले 'आ देखे जरा'

पत्नीला EDची नोटीस आल्यानंतर राऊतांचं ट्विट, म्हणाले ‘आ देखे जरा’

Subscribe

सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. तसेच २९ डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीचा समन्स बजावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा राजकीय कट असल्याचे म्हटले असून केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. आता यादरम्यान संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. राऊतांच हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया.’ राऊतांनी असं म्हणतं विरोधकांना आव्हान केलं आहे.

- Advertisement -

पीएमसी बँक आणि एचडीआयएल या दोघांमधील कर्ज वाटप आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी सध्या ईडीचा तपास सुरू आहे. त्या तपासा अंतर्गत काही संशयास्पद व्यवहार वर्षा राऊत यांच्या खात्यात झाल्याची माहिती सक्तवसुली संचालनालय (ईडी)ला मिळाली असून त्याबाबतचा पुढील तपास करण्यासाठी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांना २९ डिसेंबरला मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. मात्र, ‘मला किंवा माझ्या पत्नीला अद्याप ईडीचा समन्स आलेली नाही. त्यामुळे अधिक माहिती घेऊनच बोलेन,’ अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर MPLच्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या चेअरमन पदी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -