घरताज्या घडामोडीसंजय राऊतांकडून भाजप अध्यक्ष नड्डांचे महाराष्ट्रात स्वागत; म्हणाले, 'ते जिथे जातात तिथे...

संजय राऊतांकडून भाजप अध्यक्ष नड्डांचे महाराष्ट्रात स्वागत; म्हणाले, ‘ते जिथे जातात तिथे भाजपचा पराभव’

Subscribe

शिवसेना खासदार राऊत म्हणाले, 'ते (जेपी नड्डा) कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. तेथे काय झाले? ते जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो, त्यामुळे त्यांनी मुंबई, महाराष्ट्रात यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करु.'

मुंबई – ते (जेपी नड्डा) जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो. ते मुंबई, महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP National President J.P. Nadda) यांचे उपरोधिक स्वागत करत भाजपला टोला लगावला.

शिवसेना खासदार राऊत म्हणाले, ‘ते (जेपी नड्डा) कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. तेथे काय झाले? ते जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो, त्यामुळे त्यांनी मुंबई, महाराष्ट्रात यावे, आम्ही त्यांचे स्वागतच करु.’

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Election 2023) भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. २०१८ मध्ये १०४ जागांसह सत्तेत असलेल्या भाजपला २०२३च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या ६५ जागा मिळाल्या आहेत. येथे भाजपाध्यक्ष नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कित्येक दिवस तळ ठोकून प्रचार केला होता. मात्र तरीही येथे काँग्रेस पक्ष १३५ जागांसह बहुमताने सत्तेत आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी जेपी नड्डा यांचे मुंबईत उपरोधिक स्वागत केले आहे. ते जेवढे जास्त मुंबईत येऊन प्रचार करतील तवेढा जास्त फायदा शिवसेना ठाकरे गटाला होणार असल्याचे राऊत म्हणाले.

भाजपकडून मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपचे केंद्रीय नेते हे वारंवार मुंबईला भेट देत आहेत. केंद्रीय नेत्यांसोबतच केंद्रीय मंत्र्यांचे देखील मुंबईतील दौरे वाढले आहेत.

- Advertisement -

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे बुधवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मुंबईत आगमन होईल. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे विमानतळावर त्यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर घाटकोपर, मानखुर्द, येथे केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत नड्डा संवाद साधणार आहेत. दुपारी रमाबाई आंबेडकरनगर भागात त्यांचा कार्यक्रम आहे. मुंबईतील दलित मतदांना आपलंस करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. येथील भाजप कार्यकर्त्याच्या घरी त्यांच्या भोजनाचा कार्यक्रम आहे.

बोरिवली येथे मुंबईतील बुद्धिवंतांशी नड्डा चर्चा करणार आहेत. त्यासोबतच पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतही त्यांची बैठक आहे. भाजप अध्यक्षांचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृह येथे आहे. रात्री भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या निलंबनाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यावर रिजनेबल वेळेत निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यावरही नड्डा चर्चा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीस यांना सक्तीची विश्रांती, कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या दगदगीने प्रकृती बिघडली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -