घरमुंबईपोलीस बंदोबस्तात हत्या होणे गंभीर, अतिक अहमद प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

पोलीस बंदोबस्तात हत्या होणे गंभीर, अतिक अहमद प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : उमेश पाल अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी अतिक अहमद (atiq ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्यावर शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10 च्या आसपास हल्ला करण्यात आला, त्यात या दोघांनीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पोलीस बंदोबस्तात हत्या होणे गंभीर बाब आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

संजय राऊत म्हणाले की, बिहार मोठे राज्य आहे आणि या राज्याचे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलणे योग्य नाही. पण अतिक अहमदचा एन्काऊंटर की हत्या आहे हे माहित  नसले तरी त्या राज्यात 144 लागू केले आहे आणि तेथील सरकार परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून उद्धव ठाकरेंच्या राजिनाम्यामुळे सरकार पडले नाही – संजय राऊत

त्यांनी सांगितले की, माफिया किंवा इतर कोणाचा एन्काऊंट करणे आपण समजू शकतो, पण पोलिसांच्या बंदोबस्तात दिवसाढवळ्या हत्या होत असेल तर ती गंभीर बाब आहे. दोन दिवसांपूर्वी अतिकच्या मुलांचा एन्काऊंटर झाला आहे. मुंबईतही असे एन्काऊंटर झाले आहेत. पण मेडिकल कॉलेजसमोर एखाद्या माफियाची किंवा गुंडाची पोलिसांच्या बंदोबस्तात हत्या करण्यात येत असेल आणि हल्ला करणारे तरूण मुल असतील. त्यांना पोलिसांनी पकडले असले तरी ही गंभीर बाब आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात एखाद्या गुंडाची हत्या झाली असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या बंदोबस्तात दोन माफिया होते, त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे होते. मात्र काही वर्ष ते खासदार होते हे सुद्धा विसरता येणार नाही. त्यामुळे पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात मारेकरी घुसून त्यांची हत्या करत असतील तर प्रश्न चिन्ह निर्माण होतो आणि त्यावर प्रश्न विचारले जातात, असे संजय राऊत म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -