घरमुंबईराज्य सरकारने CBI ला परवानगी नाकरली हे योग्यच; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने CBI ला परवानगी नाकरली हे योग्यच; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्र शासनाने एका अद्यादेशाद्वारे सीबीआयला राज्यात तपास करण्याची परवानगी काढून घेतली आहे. त्यामुळे सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबत काल, बुधवारी आदेश काढला. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्ये तपास यंत्रणांचा गैरवापर होत होता, असेही त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत

सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांच्या अधिकारांचा वापर जिथे विरोधकांची राज्यं आहेत, आपल्या विचारांची राज्यं नाहीत त्यांना त्रास देण्यासाठी, बदनाम करण्यासाठी कोणी करत असेल तर नाईलाजाने राज्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पश्चिम बंगालमध्ये हा प्रसंग आला आहे. आंध्रमध्येही आहे…महाराष्ट्र शेवटचं राज्य आहे. संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच हा निर्णय झाला. मुंबई पोलिसांनी तपास करायला घेतला आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचले की ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास जायचा. कुठेतरी वेगळ्या राज्यात गुन्हा दाखल करुन महाराष्ट्रात घुसतात. हे किती काळ चालणार. शेवटी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्याचे मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. येथील तपास यंत्रणाही तेवढ्या सक्षम आहेत, असे राऊत म्हणाले.

काय आहे सरकारचा निर्णय

सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, सीबीआयकडून राज्यात तपासाची परवानगी काढून घेण्यात आली असली तरी सध्या सुरू असलेली अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण आणि सीबीआयने टीआरपी घोटाळ्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या चौकशीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने सीबीआयला त्यांच्या अधिकार क्षेत्रातील केंद्रीय सरकारी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याची दिलेली परवानगी मात्र मागे घेण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Covid-19: ब्राझीलमध्ये ऑक्सफोर्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू; तरीही चाचणी सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -