Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईRaut Vs Shinde : राऊतांनी म्हटलं, 'एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलंय'; सेनेच्या...

Raut Vs Shinde : राऊतांनी म्हटलं, ‘एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलंय’; सेनेच्या आमदाराने धू-धू धुतले; म्हणाले, “चार घरचा…”

Subscribe

Eknath Shinde : शिवसेनेचे आमदार म्हणतात, "एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही का? त्यांना काही वेगळा निर्णय घ्यायचा आहे? असं समजण्याचं काहीच कारण नाही."

एकनाथ शिंदे हे मनानं खचलेले आहेत. ते अस्वस्थ आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ बिघडलेले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करावेत, अशी खोचक टीप्पणी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली होती. याला शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यामुळे दोन्ही ‘संजय’मध्ये चांगलीच जुंपली आहे.

प्रसारमध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले, “मानसिक संतुलन कुणाचे बिघडलं, हे निकातून समोर आलं आहे. हे उर बडवून सांगत होते, आमची सत्ता येणार आहे. मात्र, यांचे 60 आमदारही निवडून आले नाहीत. मानसिक संतुलन यांचं बिघडलं आहे.”

- Advertisement -

“चार घरचा पाहुणा ज्याला त्याचा नेता कोण माहिती नाही. काहीजण फक्त शेपूट हलवण्याचं काम करतात. शेपूट हलवत असताना आपल्या मालकाची चाकरी करणे, ज्यांना माहिती, तेच लोक अशी काम करतात,” अशी टीका शिरसाट यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

ईडी, सीबीआयचे भय असणारे लोकं मोठा निर्णय घेऊ शकत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. याबद्दल विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “भाजपनं एकनाथ शिंदे यांना पद का दिले, याची कल्पना त्यांना आहे. भाजपच्या दारात जाऊन कितीदा माघारी आले, याची कल्पनाही संजय राऊतला आहे. आम्ही जे मिळवलं, कष्टानं आणि हिंमतीनं मिळवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव महाराष्ट्र आणि देशानं पाहिला आहे. शिंदेंना घेऊ नका म्हणून अनेकदा फोन करण्यात आले. कुठल्या माध्यमातून फोन केले, याचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत.”

- Advertisement -

“एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नाही का? त्यांना काही वेगळा निर्णय घ्यायचा आहे? असं समजण्याचं काहीच कारण नाही. दिलेरपणानं शिंदेंनी सत्ता सोडली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखे नाटके करणारी लोक नाहीत. आमच्या चेहऱ्यावर असते, तेच ओठावर असते. नाराजी असेल, तर ती उघड जाहीर करू,” असं शिरसाट यांनी म्हटलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -