घरमुंबईयाआधी 'या' कार्यक्रमांतही सरस्वती पूजन नाकारले होते!

याआधी ‘या’ कार्यक्रमांतही सरस्वती पूजन नाकारले होते!

Subscribe

अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर भुजबळ बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने जोरदार विरोध केला आहे. मात्र, छगन भुजबळांनी छेडलेला सरस्वती पूजनाविरोधातील हा मुद्दा नवीन नाही. याआधीही अनेकांनी सरस्वती पूजनाला विरोध दर्शवला आहे. 

मुंबई – छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये सरस्वती पूजनावर आक्षेप घेत त्याजागी महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करण्याचं आवाहन केलंय. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा? ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असं वक्तव्य आमदार छगन भुजबळ यांनी केले आहे. अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर भुजबळ बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने जोरदार विरोध केला आहे. मात्र, छगन भुजबळांनी छेडलेला सरस्वती पूजनाविरोधातील हा मुद्दा नवीन नाही. याआधीही अनेकांनी सरस्वती पूजनाला विरोध दर्शवला आहे.

हेही वाचा – शाळेत सरस्वतीचा फोटो का? त्यांची पूजा का करायची? छगन भुजबळांचे वादग्रस्त विधान

- Advertisement -

अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावरून छगन भुजबळांनी सरस्वती पूजनापेक्षा महापुरुषांच्या पूजनाचं आवाहन केलं. ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून त्यांची पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगरे नंतर बघूया असं विधान भुजबळांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला भाजपाने विरोध केला असून ब्राह्मण महासंघानेही आक्षेप नोंदवला आहे.

छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही सरस्वती पूजन झाले नाही. डिसेंबर २०२१ मध्ये नाशिकमध्ये हे संमेलन पार पडले. सारस्वतांचा मेळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन सरस्वती पूजनाने करण्याची आजवरची परंपरा होती. मात्र, ९४ व्या संमेलनात ऐनवेळी सरस्वती पूजन नाकारण्यात आले. मात्र, दीपप्रज्वलन आणि पालखीमध्ये ठेवलेल्या ग्रंथांचं पूजन करण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा – पवारांसोबत असणाऱ्यांना श्रद्धेचं महत्त्व समजणार नाही, भुजबळांचं वक्तव्य ओवैसींसारखं; नीलेश राणेंची टीका

कवी आणि विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनीही सरस्वती पूजन करावे लागू नये याकरता पुरस्कार नाकारला होता. म्हणजेच, राजकीय नेत्याकडूनच सरस्वती पूजनाला विरोध नाही तर, समाजातील इतर वर्गातूनही अनेकदा सरस्वती पूजनाला नकार मिळाला आहे. विदर्भ साहित्य संघाद्वारे जीवनव्रती पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार जानेवारी २०२१ मध्ये डॉ.मनोहर यशवंत यांना जाहीर झाला होता. ‘मी माझ्या तत्त्वांना मुरड घालून हा पूरस्कार स्विकारू शकत नाही’, असं डॉ.मनोहर यशवंत म्हणाले होते. मी धर्मनिरपेक्षता मानतो. विदर्भ साहित्य संघाला याची माहिती असायला हवी असंही डॉ.यशवंत म्हणाले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय असेल अशी चौकशी डॉ.यशवंत यांनी केली. त्यावेळी तिथं सरस्वतीची प्रतिमा असेल असं त्यांना समजलं. त्यामुळे मी माझी तत्त्व बाजूला सारून पुरस्कार स्वीकारू शकत नाही, अशी ठाम भूमिका डॉ. यशवंत मनोहर यांनी घेतली. सरस्वती प्रतिमेऐवजी आपण सावित्रीबाई फुले आणि भारताच्या संविधनाची प्रतिमा का ठेवू नये? असंही त्यांनी विचारलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -