घरमुंबईपारंपरिक शत्रू राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने-सामने?

पारंपरिक शत्रू राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आमने-सामने?

Subscribe

पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यसभा निवडणूकीतील सहाव्या जागेसाठी कोल्हापूरमधील दोन प्रतीस्पर्धी उमेदवार समोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकीत परत एकदा पडद्यामागून सतेज पाटील आणि धनंजय महाडीक यांच्यात लढत होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण आतापर्यंत कोल्हापुरात सतेज पाटील यांनी महाडीक यांचा अनेक वेळा पराभव केला आहे. यामुळे जर महाडीक निवडून आले तर याचा फटका कोल्हापूर महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना बसणार आहे. यामुळे सतेज पाटील शिवसेनेच्या संजय पवार यांना बळ देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नुकतीच कोल्हापूर उत्तरची विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीत प्रत्यक्ष लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झाली असली तरी प्रत्यक्षात ही लढत सतेज पाटील विरुद्ध महाडीक अशीच झाली. कारण भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम हे महाडीक यांचे नातेवाईक होते. या निवडणूकीत ‘आता आपली जबाबदारी’ म्हणत सतेज पाटील यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा 18,900 मतांनी पराभव केला .

- Advertisement -

गोकूळमध्ये पराभव 
या पूर्वीच्या गोकूळच्या निवडणूकीत ‘आमच ठरलंय आता गोकूळ फक्त उरलंय’ म्हणत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी 21 पैकी 19 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आणि महाडीकांच्या सुमारे दीड दशकाच्या वर्चस्वाला धक्का दिला.

2019 मध्ये काँग्रेसचा विजय 
2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील 10 पैकी 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला, तर राष्ट्रवादीने 2 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे अमल महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसकडून पुतण्या ऋतुराज पाटील यांना तिकीट दिले होते. ऋतुराज पाटील विजय झाले आणि अमल महाडिक हरले. त्यानंतर 2021 मध्ये कोल्हापूर विधानपरिषद बिनविरोध झाली.

- Advertisement -

धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार आणि विजय 
२०१९ मध्ये कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सतेज पाटील यांची आमचं ठरलंय ही घोषणा गाजली होती. सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांना थेट विरोध केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनही महाडिकांनी विधानसभा निवडणुकीत घात केल्याचा आरोप सतेज पाटलांचा होता. त्याचाच वचपा सतेज पाटलांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काढला. त्यांनी धनंजय महाडिकांविरोधात प्रचार करुन, शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांना मदत केली. त्यावेळी आमचं ठरलंय असा नारा दिला आणि धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

महापालिका निवडणूकीत विजय 
या आधीची महापालिका निवडणूक ही सतेज पाटील यांनी जिंकली आहे. या निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत सतेज पाटील धनंजय महाडीक यांच्या विरोधात नवी काय राजकीय खेळी करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -