सतीश मानेशिंदेनी कोर्टाला का सांगितलं, आर्यनला NCB ची एकदिवसाची कोठडी द्या?

सतीश मानेशिंदेनी कोर्टाला का सांगितलं, आर्यनला NCB ची एकदिवसाची कोठडी द्या?

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह तीन आरोपींना, जे मुंबईत क्रूझवर रेव्ह पार्टीमध्ये पकडले गेले, त्यांना एनसीबीने रविवारी अटक केली. या आरोपींच्या अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर देखील करण्यात आले. न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे ४ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहेत. तीन आरोपींना कोठडीत पाठवण्यापूर्वी आर्यन खानचे वकील सतीश मनेशिंदे यांच्यासह उर्वरित वकिलांनी न्यायालयात आपापली बाजू मांडली. यावेळी एनसीबीच्या वकिलांनीही आपले युक्तिवाद दिले. दरम्यान वकील सतीश मानशिंदे यांनी आर्यन खान यांच्या एक दिवसाच्या एनसीबी कोठडीची मागणी केल्याचे समोर आले आहे.

साधारणतः न्यायालयात कोणताही वकील आपल्या अशीलाच्या बाजून लढत असतो. तसेच त्यांची बाजू मांडत असताना त्याला जामीन मिळावा यासाठी वकील नेहमीच जामीनाची मागणी मिळावी यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु याउलट सतीश मानशिंदे यांनी आर्यन खानच्या एनसीबी कोठडीची मागणी केली. सतीश मानशिंदे हे खूप अनुभवी वकील असून त्यांच्या मागणीमागे काहीतरी नक्की वेगळा हेतू असावा असे म्हटले जात आहे. जाणून घ्या, सतीश मनशिंदेंनी स्वतः एक दिवसीय आर्यन खानच्या कोठडीची मागणी का केली असावी?

असे आहे नेमके कारण…

सतीश मानशिंदे यांनी एक दिवस आर्यन खानची एनसीबी कोठडी मागितली यामागे विशिष्ट कारण असल्याचे सांगितले जात आहे. जर सतीश मानशिंदे यांनी रविवारी जामीनासाठी अर्ज केला असता तर आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेला असता, त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत जावे लागले असते. अशा परिस्थितीत आर्यन खानला रविवारची रात्र जेलमध्ये काढावी लागली असती. त्यामुळे सतीश मानशिंदे यांनी एनसीबीच्या ताब्यात घेण्यास विरोध केला नाही. यावर ते असेही म्हणाले की, आर्यन खानला एक दिवसाची कोठडी एनसीबीने द्यावी. अशाप्रकारे आर्यन खान आता एनसीबी कार्यालयात आहे. यानंतर आज, सोमवारी सतीश मानशिंदे न्यायालयात जामिनासाठी अर्जदेखील दाखल करणार आहे.

ज्यावेळी आर्यन खानला कोर्टात दाखल करण्यात आले तेव्हा तो खूप बिथरलेल्या अवस्थेत आणि अस्वस्थ दिसत होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान, तीन आरोपींच्या वकिलांनी आरोपींना भेटण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली. यानंतर, जेव्हा सतीश मानशिंदे आर्यनशी बोलले, तेव्हा आर्यन थोडा रिलॅक्स दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयात सांगितले की, आर्यन खान स्वतःहून क्रूझ पार्टीला गेला नाही आणि त्याच्याकडे पार्टीचे तिकीटही नाही. त्याला पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याच्या बॅगेतही काहीही सापडले नाही. इतकेच नाही तर आर्यन खानच्या फोनमध्येही कोणतेही यासंदर्बातील चॅट्स आढळले नाहीत.


Monsoon Withdraw : १९६० नंतर यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने, तारीख ठरली