घरताज्या घडामोडीमध्य रेल्वे मार्गावरील 'या' स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील ‘या’ स्थानकादरम्यान शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी कुर्ला-भांडुप विभागावर (कुर्ला आणि भांडुप स्टेशन वगळून) विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी कुर्ला-भांडुप विभागावर (कुर्ला आणि भांडुप स्टेशन वगळून) विशेष रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवारी आणि रविवार मध्यरात्री या कालावधीत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. (Saturday midnight special block between Kurla-Bhandup station on Central Railway line)

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला-भांडुप विभागाच्या अप आणि डाऊन मार्गावरील धिम्या आणि जलद मार्गावरील 5व्या आणि 6व्या लाइनवर शनिवारी (27 मे) मध्यरात्री 01.10 ते रविवार पहाटे 04.20 वाजेपर्यंत विशेष रात्रीचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेद्वारे विंच मशीन वापरून पूर्व ते पश्चिम दिशेने एन वॉर्डमधील LBS मार्ग ते RC मार्गाला जोडणारा विद्याविहार ओलांडून रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पहिला ओपन वेब गर्डर सुरू करण्यासाठी रात्रीची वाहतूक आणि पॉवर ब्लॉक.

उपनगरीय गाड्या ‘अशा’ धावतील

- Advertisement -
  • 27.5.2023 रोजी कुर्ला ते ठाणे दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा ब्लॉक कालावधीत बंद राहतील.
  • 28.5.2023 रोजी ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस वरून 23.47 वाजता सुटणारी ट्रेन T-151 रद्द राहील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस साठी ठाण्याहून अनुक्रमे T-2 आणि T-4 04.00 आणि 04.16 वाजता सुटणारी ट्रेन रद्द राहील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस साठी कर्जतहून 02.33 वाजता सुटणारी ट्रेन S-2 ठाणे येथे टर्मिनेट होईल.
  • अंबरनाथसाठी ट्रेन A-3, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस 05.16 वाजता सुटणार आहे, ती ठाणे येथे टर्मिनेट होईल.

या गाड्या शॉर्ट टर्मिनेट

  • 11020 भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस कोणार्क एक्स्प्रेस ठाणे स्टेशनवर.
  • 18030 शालीमार-एलटीटी एक्सप्रेस ठाणे स्टेशनवर.
  • 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस मेल दादर स्टेशनवर.या गाड्यांचे नियमन ‘असे’ असेल
  • 12810 हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस मेल दिवा स्टेशनवर (अप फास्ट लाईन) ०३.३५ ते ४.१० वाजेपर्यंत,
  • 12134 मंगळुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस एक्सप्रेस दिवा स्टेशनवर (६वी लाईन) ०३.४२ ते ४.०० वाजेपर्यंत,
  • 18519 विशाखापट्टणम-एलटीटी एक्सप्रेस कल्याण स्टेशनवर 03.29 ते 04.00 वाजता,
  • 20104 गोरखपूर-एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेस कल्याण स्टेशनवर 03.48 ते 04.00 वाजेपर्यंत,
  • 12702 हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस हुसेन सागर एक्स्प्रेस कल्याण स्थानकावर ०३.४८ ते ४.१० वाजता,
  • 11140 गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिणस एक्सप्रेस आणि त्यावरील नियमन केलेल्या गाड्या त्यांच्या नियोजित वेळेच्या २० ते ३० मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही वाचा – रविवारी ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर, मध्य व हार्बर रेल्वे धावणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -