घरताज्या घडामोडीजेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे निधन!

जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे निधन!

Subscribe

सविता यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले होते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी उषा उर्फ सविता रणदिवे यांचे आज पहाटे दादर येथील निवास्थानी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. भायखळा येथील मम्माबाई हाईस्कूलमधून प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. रक्तस्राव होऊन त्यात त्यांचे निधन झाले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच आपले ध्येय मानून सविता यांनी दिनू यांच्याबरोबर सामाजिक कामांना वाहून घेतले होते. श्रमिक, आदिवासी, कामगार, शोषित यांच्या त्या मोठ्या आधार होत्या.

सविता यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले होते. राष्ट्रसेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असलेल्या सविता या दिनू रणदिवे यांच्यासाठी प्रेरणा स्थान होत्या. त्यांच्या प्रत्येक कार्यात सविता यांनी समर्थ साथ दिली. रणदिवे यांनी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व्यंगचित्र काढण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी ती मान्य केली. विशेष म्हणजे बाळासाहेब यांच्याकडून दररोज व्यंगचित्र आणायचे काम सविता या करत असत.

- Advertisement -

चिंचपोकळी येथील प्रेमजी देवजी कन्या विद्यालयात गुजराती भाषेच्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले होते. शिक्षक संघटनेच्या त्या कार्यकर्त्या होत्या. शिक्षक संघटनेचे अर्ध्वयू तात्या सूळे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात त्यांचा सहभाग होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी १९५६ साली शिवाजी पार्क येथे सर्वभाषिकांच्या झालेल्या पहिल्या परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. गुजराथी भाषिकांची प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या भाषणात मुंबई हा महाराष्ट्राचाच भाग असावा अशी आग्रही भूमिका मांडली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -