Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई महाराष्ट्रात स्केल, स्कॅम आणि सेटिंगचा खेळ! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदे, BMC वर...

महाराष्ट्रात स्केल, स्कॅम आणि सेटिंगचा खेळ! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदे, BMC वर घोटाळ्याचे आरोप

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत रस्ता घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरें यानी केला आहे. रस्ते कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

मुंबई महानगर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे महाराष्ट्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारवर कोट्यवधींच्या रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे. आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की मुंबईतील रस्ते घोटाळ्याबद्दल मी जानेवारी २०२३ पासून आवाज उठवत आहे. मुंबई महापालिकेने रस्त्यांच्या स्केल, स्कॅम आणि सेटिंगबद्दल सांगावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्केल, स्कॅम आणि सेटिंग…
शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणावरुन पुन्हा एकदा शिंदे सरकरावर आरोप केला आहे.
मुंबई महापालिकेकडून (BMC) २०२१-२२ पासून रस्त्यांची कामे सुरु आहेत. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लहरीपणामुळे मुंबई पालिकेन अचानक निर्णय घेतला की मुंबईतील ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे टप्प्याटप्प्यांऐवजी एका निविदेद्वारेच काँक्रिटीकरण केले जाईल. यावर ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, जागतिक स्तरावर कोणत्याही शहरात रुंदी आणि गरजेनुसार रस्त्यांचे काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण केले जाते, हे कधीही एकसारखे किंवा ठोस नसते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या लहरीपणामुळे ४०० किलोमीटरच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरात जिथे एकाचवेळी ५० मीटरचे काम करणे देखील ट्रॅफिकमुळे आणि फुटपाथच्या उंचीमुळे कठीण आहे. तिथे ४०० किलोमीटरचे रस्ते सरकारमधील कंत्राटदार मित्रांना लाभ होण्यासाठी मुंबई महापालिकेने घाईघाईने मंजूर केले आहे.

कामाची वेळ चुकीची
मुंबईमध्ये रस्ते दुरुस्ती किंवा बांधणी करण्याचा काळ हा ऑक्टोबरपासून सुरु होतो. दरवर्षी पावसाळी कामे अंदाजे ३१ मेपर्यंत संपलेली असतात. शिंदे सरकारचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी निवडलेल्या वेळेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले, काही कामे ही एप्रिलमध्ये सुरु झाली आहे. ३१ मेपर्यंत ती कशी पूर्ण होणार, याचा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आणि पालिकेने विचार केला आहे का? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्वतः सांगितले आहे, की रस्त्यांची कामे पूर्ण होण्यासाठी ३६ महिने लागतील. यात पावसाळ्याचा चार महिन्यांचा काळ वगळलेला आहे. असे असताना आता ४०० किलोमीटरचे रस्त्यांचे कंत्रात मित्रांना देण्यात आल्याबद्दल ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

घोटाळा
ऑगस्टमध्ये ५ हजार कोटींच्या रस्त्यांच्या निविदा काढल्या. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा काढण्यात आल्या.
यात बीएमसीने अंदाजे खर्चात २० टक्के वाढ करुन कंत्राटदारांच्या फायद्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय अनुभव असणाऱ्यां कंत्राटदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा ठपका ठाकरेंनी ठेवला आहे.
दर आणि कालावधीत झालेली २० टक्क्यांची वाढ ही कंत्राटदारांसाठी प्रत्यक्षात ४० टक्के वाढ असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या मुंबईत सिंमेट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी प्रति किलोमीटरला १० कोटी रुपये खर्च येत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना दिलेल्या कंत्राटानुसार अंदाजे प्रति किलोमीटर १७ कोटी रुपये खर्च येणार आहे. असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.
हे झाले फक्त रस्त्यांच्या कामाचे, त्यात अजून स्ट्रीट फर्निचरच्या कामांचा समावेश नाही. मुंबई महापालिकेने हे काम दुसऱ्या कंत्राटदारांना दिले आहे. त्यात सरळसरळ २६३ कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे.

या मेगा वर्कसाठी राष्ट्रीय अनुभव असेलल्या पाच कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या आहेत. जणूकाही या निविदा त्यांच्यासाठीच तयार करण्यात आल्या आहेत, असे सेटिंग केले गेले असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

- Advertisment -