Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई पालिका औषधखरेदी प्रक्रियेत घोटाळा; डॉक्टर, अधिकाऱ्यांचे संगनमत; चौकशीची मागणी

पालिका औषधखरेदी प्रक्रियेत घोटाळा; डॉक्टर, अधिकाऱ्यांचे संगनमत; चौकशीची मागणी

Subscribe

मुंबई महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने या ठिकाणी हजारो रुग्णांसाठी आवश्यक औषधांच्या खरेदीबाबत निविदा प्रक्रिया नीटपणे न राबवता पालिकेच्या संबंधित मध्यवर्ती खरेदी खात्यातील अधिकारी व डॉक्टर यांच्या संगनमताने मोठा घोटाळा झाला आहे, असा खळबळजनक आरोप ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने या ठिकाणी हजारो रुग्णांसाठी आवश्यक औषधांच्या खरेदीबाबत निविदा प्रक्रिया नीटपणे न राबवता पालिकेच्या संबंधित मध्यवर्ती खरेदी खात्यातील अधिकारी व डॉक्टर यांच्या संगनमताने मोठा घोटाळा झाला आहे, असा खळबळजनक आरोप ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला.(  Scam in municipal drug procurement process Collusion of doctors authorities Demand for inquiry )

या घोटाळयासंबंधित सविस्तर माहिती कागदोपत्री पुराव्यासह पालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर इकबाल चहल यांना मेल करणार असल्याचे अभय पांडे यांनी सांगितले. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरीलप्रमाणे आरोप करीत माहिती दिली. मुंबई महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येतात. त्यांना आवश्यक औषधी गोळ्या, इंजेक्शन आदी मोफत व माफक दरात दिले जाते. तीन वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया पारदर्शक होती. आता औषध खरेदी निविदा प्रक्रिया नव्याने व नीटपणे राबवली जात नाही. तसेच, आता पालिका मध्यवर्ती खाते, संबंधित अधिकारी व डॉक्टर हे संगनमत करून आणि लोकल औषध पुरवठादारांना हाताशी धरुन औषधांची चुकीच्या पद्धतीने विक्री करत आहेत. रुग्णांसाठी आवश्यक औषधांची खरेदी नीटपणे करण्यात येत नाही.

- Advertisement -

वास्तविक, मुंबई महापालिकेच्या शेड्युलमध्ये २६७ प्रोडक्ट असून ६० प्रोडक्ट अंतिम केले आहेत. मात्र या ६० प्रोडक्टमध्ये इंजेक्शन, आयबी, ग्लोज, टॅबलेट, विशेष करुन लहान मुलांना देण्यात येणारे सिरप, ओआरएसचा साठा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे हा औषध साठा उपलब्ध नसताना पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाने नवीन निविदा मागवलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेच्या ५ मेडिकल कॉलेज, २० पेरिफेअल रुग्णालये, ३० मॅर्टनिटी होम व १५० आपलं दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक औषधांचा पुरवठा न होता त्याची चणचण भासत आहे. रुग्णांचे हाल होत आहेत. जर रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर न मिळाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. मध्यवर्ती खात्यातील काही अधिकारी व डॉक्टर यांच्या संगनमताने निविदा प्रक्रिया नीटपणे न राबविता लोकल औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करीत असून त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप ऑल इंडिया फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त चहल यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

( हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवाल : सर्वोच्च न्यायालयाने SEBI ला फटकारले; म्हणाले- थोडी तरी… )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -