घरमुंबईडोंबिवलीत तिरडीच्या चटईत गोलमाल?; मनसेकडून प्रकार चव्हाट्यावर

डोंबिवलीत तिरडीच्या चटईत गोलमाल?; मनसेकडून प्रकार चव्हाट्यावर

Subscribe

डोंबिवलीत तिरडीच्या चटईत गोलमाल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहा फूट लांबीची चटई ही ३ ते ४ फूट करून विकली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका विविध घोटाळ्यांनी गाजत असतानाच आता अंत्यविधीसाठी लागणाऱ्या तिरडीच्या चटईत घोटाळा होत असल्याचा क्लेशदायक प्रकार समोर आला आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष केतन सावंत यांनी हा प्रकार उजेडात आणला आहे. सहा फूट लांबीची चटई ही ३ ते ४ फूट करून विकली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

डोंबिवलीतील स्मशानभूमीतूनच अंत्यविधीसाठी लागणारे सामान मिळते. अंत्यविधीच्या सामानाबरोबरच तिरडीसाठी वापरण्यात येणारी चटई असते. पालिकेकडून अंत्यविधीच्या सामानाचा खासगी ठेका देण्यात आला असून त्यांच्या मार्फतच सामानाची विक्री केली जात आहे. मात्र तिरडीसाठी वापरण्यात येणारी चटई ही लांबीने कमी असल्याचा प्रकार समोर आला आहे. चटईची लांबी ही साधारण पाच ते सहा फूट असते. पण तीन फुटाची चटई देण्यात आल्याचा प्रकार मनसेने चव्हाटयावर आणला आहे. ही चटई तिरडीवर बांधताना आखूड झाल्याने खूपच अडचणीची ठरली. त्यामुळे दोन चटई लावाव्या लागल्या. त्या दोन्ही चटईसाठी वेगवेगळे पैसे अदा करावे लागले, असे सावंत यांनी सांगितले.

हे वाचा – नागबळी विधी कुणी करायचा? पुरोहितांच्या दोन गटात नाशिकमध्ये संघर्ष

शिवमंदिर स्मशानभूमीतील चटईच्या प्रकारानंतर पाथर्ली येथील स्मशानभूमीत पाहणी केली असता पूर्ण चटई मधूनच कापण्यात येते आणि अर्धी चटई पूर्ण चटई म्हणून विकण्यात येत असल्याचा आरोप सावंत यांनी आपलं महानगशी बोलताना केला. त्यामुळे एक चटई देताना ती कापून दोन चटईचे पैसे घेतले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. सहा फुटाची ही चटई ३ ते ४ फूटाची का करण्यात आली? याची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.

अंत्यविधीसाठी वापरण्यात येणारी चटई ही मुंबईतील मस्जिद बंदर येथून मागवली जाते. एक सारखीच लांबीच्या या चटई असतात. इतक्या मोठया गठ्ठयांमध्ये एखादी चटई कमी लांबीची असू शकते. चटई कापून ती अर्धी करून दिली जात नाही. त्यामुळे चटईमध्ये कोणत्याही प्रकारचा गोलमाल नाही.
– किसन जगताप, कॉन्ट्रक्टर पाथर्ली स्मशानभूमी
- Advertisement -

काय म्हणणे आहे कर्मचाऱ्यांचे?

साधारण पाच फुटाच्या उंचीपर्यंत ही चटई असते. चटई ही वेगळया पध्दतीने विणलेली असते. त्यामुळे ती अर्धी कापता येत नाही. त्यामुळे अर्धी करून विकण्याचा प्रश्न येत नाही, असे शिवमंदिर स्मशानभूमीतील कंत्राटदाराच्या एका कर्मचा-याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -