घरमुंबईयंदा फक्त 237 दिवस शाळा

यंदा फक्त 237 दिवस शाळा

Subscribe

राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यंदा शाळेचे पहिले सत्र ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चंगळ असणार आहे.

राज्यातील शाळा यंदा 13 जूनपासून सुरू होणार असून, यावर्षी शाळा फक्त 237 दिवस सुरू राहणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक परिपत्रकाद्वारे नुकतेच घोषित केले आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यंदा शाळेचे पहिले सत्र ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, तर दुसरे सत्र ९ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. सुट्ट्यांच्या बाबतीत मात्र यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चंगळ असणार आहे. यावर्षी २० अतिरिक्त सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. तसेच दिवाळीच्या २६, उन्हाळ्यामध्ये ३६ आणि अतिरिक्त ४ अशा सुट्ट्या आहेत. यामध्ये रविवारच्या ५२ सुट्ट्यांचा समावेश केलेला नाही.

- Advertisement -

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकूण १२८ सुट्ट्या

म्हणजे यंदा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकूण १२८ सुट्ट्या मिळणार आहेत. शाळांचे वार्षिक वेळापत्रक मार्च २०२०पासूनच्या कोरोना लॉकडाऊनपासून बिघडले आहे. मागील वर्षीच्या जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. त्यानंतर ऑक्टोबरपासून ऑफलाईन शाळा सुरू झाल्या. यंदा शाळा सुरळीत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. मुलेही युनिफॉर्ममध्ये दिसतील आणि तासही नियमित सुरू होतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आठवड्यातील तासांची संख्या ४५वरून ४८ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -