घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनाच्या उपचारादरम्यानच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे साधन विकसित

CoronaVirus: कोरोनाच्या उपचारादरम्यानच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे साधन विकसित

Subscribe

एससीआयएमएसटीच्या वैज्ञानिकांचे संशोधन हे शोषक साधन विकसित केले आहे.

‘एससीटीआयएमएसटी’ अर्थात श्री चित्र तिरूनल वैद्यकीय शास्त्र आणि तंत्रज्ञान संस्था या संस्थेतील वैज्ञानिकांनी संक्रमित श्वसन स्त्रावांचे आणि शरीरातल्या इतर द्रव पदार्थांची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी शोषक साधन विकसित केले आहे. संक्रमित रुग्णांच्या अपशिष्टांची विल्हेवाट लावणे हे रुग्णालयांपुढे एक मोठे आव्हान असते. कोविड-१९ सारख्या आजार झालेल्या रुग्णांच्या स्त्रावांचा मोठाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला जास्त धोका संभवतो. म्हणूनच हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

संक्रमणाचा प्रसार होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक

‘एससीटीआयएमएसटी’च्या जैववैद्यकीय तंत्रज्ञान विभागाच्या जैवसामुग्री विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डॉ. मंजू एस. आणि डॉ. मनोज कामथ यांनी विकसित केलेल्या या साधनाचे नामकरण ‘चित्र ॲक्रिलोसॉर्ब सिक्रेशन सॉलिडिफिकेशन सिस्टिम’असे करण्यात आले आहे. या साधनामुळे जी व्यक्ती संक्रमित आहे, त्या व्यक्तिच्या श्वसनातून जे द्राव बाहेर येतात. तसेच शरीरातून जे इतर द्रव पदार्थ बाहेर टाकले जातात, त्यांच्यामुळे संक्रमणाचा प्रसार होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे. या नव्याने विकसित केलेल्या साधनामुळे संक्रमित व्यक्ती बाहेर टाकत असलेल्या द्रव पदार्थांचे अतिशय वेगाने शोषण होते. आणि त्याचे घनरूप बनते, तसेच निर्जंतुकीकरणही होते.

- Advertisement -

कोणत्याही संसर्गजन्य परिस्थितीमध्ये रुग्णांकडून होणाऱ्या संक्रमित स्त्रावांची सुरक्षित विल्हेवाट लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी जंतुनाशक साहित्यासह एक उत्कृष्ट शोषक जेल बनवण्याची गरज होती. या जेलमुळे रुग्णाने बाहेर टाकलेले अपशिष्ट इतर कशातही विरघळण्यापूर्वीच त्याचे विलगीकरण आणि त्याला घनरूप देणे शक्य होणार आहे. रुग्णाचे अपशिष्ट एकत्र करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाचे निर्जंतुकीकरणही करता येते, अशी माहिती डीएसटीचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी दिली.

यामुळे साफसफाई करण्याची गरज भासणार नाही

नव्याने विकसित केलेले हे साधन त्याच्या वजनापेक्षा २० पट जास्त द्रवपदार्थाचे शोषण करू शकतो. निर्जंतुकीकरणासाठी त्यामध्ये विघटनशील पदार्थ वापरण्यात आले आहेत. असे साधन दूषित द्रवपदार्थ जेलसारखे स्थिर करतील अपशिष्टांना घनरूप देतील. निर्जंतुकीकरणाचे काम यामध्ये होत असल्यामुळे उर्वरित सर्व सामान्य जैववैद्यकीय कचरा म्हणून त्याचे विघटन करणे शक्य होईल. या तंत्रज्ञानामुळे रुग्णालयातल्या कर्मचारी वर्गाला बाटल्या आणि मोठ्या कचरा पेट्या पुन्हा वापरण्यासाठी निर्जंतूक करणे आणि साफसफाई करण्याची गरज भासणार नाही. तसेच त्यांना संसर्गाचा असणारा धोकाही कमी होईल. संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची, त्याच्या अपशिष्टाची विल्हेवाट लावणे अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.

- Advertisement -

अॅक्रिलोसॉर्बचे तंत्रज्ञान

या नवीन विकसित केलेल्या साधनांमध्ये सक्शन कॅनिस्टर्स, डिस्पोजेबल स्पिट थैल्या, ‘ॲक्रिलोसॉर्ब’ तंत्रज्ञानासह तयार केल्या आहेत. त्यांच्या आतमध्ये ॲक्रिलोसॉर्बचे एक अस्तर घातले आहे. अॅक्रिलोसॉर्ब सक्शन कॅनिस्टर्स हे अतिदक्षता विभागातल्या रुग्णांसाठी किंवा साध्या वॉर्डमधल्या रुग्णांसाठीही वापरता येतील. या रुग्णांनी नेमके किती द्रव पदार्थ बाहेर टाकले, याची नोंदही ठेवता येईल. वापरल्यानंतर या थैल्या ‘सील’करता येतील. तपासणीनंतर टाकाऊ वस्तूंमध्ये जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावताना त्या जाळून टाकणे शक्य होईल. श्वसनसंबंधी आजार झालेल्यांची थुंकी, लाळ घट्ट करणारे जेल आतून लावलेल्या ॲक्रिलोसॉर्ब पिशव्या वापरल्या तर त्या नंतर जाळून टाकता येतील.


हेही वाचा – CoronaVirus: पिण्याच्या पाण्यासाठी सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -