घरमुंबईम्हाडाच्या भरतीसाठी कागदपत्र पडताळणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा जाहीर

म्हाडाच्या भरतीसाठी कागदपत्र पडताळणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा जाहीर

Subscribe

म्हाडाने सरळ सेवा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. सरळ सेवा भरती 2021 अंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाई परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संवर्गनिहाय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही पडताळणी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उमेदवारांच्या कागपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील उमेदवारांची पडताळणी केली जाणार आहे.

वरिष्ठ लिपीक आणि खनिष्ठ लिपीक पदासाठी येथे पडताळणी –
कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्याची पडताळणी 14 ते 17 जून या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. ही पडताळणी सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे.

- Advertisement -

अभियांत्रिकी सहायक, लघुटंकलेखक, वरिष्ठ लिपीक पदासाठी येथे पडताळणी –
कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहन म्हाडा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर –

- Advertisement -

म्हाडाने जाहीर केलेल्या सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -