घरताज्या घडामोडीCorona Virus : मुंबईत जमावबंदी लागू

Corona Virus : मुंबईत जमावबंदी लागू

Subscribe

सध्या राज्यात करोनाग्रस्तांचा संख्या वाढत आहे. त्यापैकी मुंबईत एकूण पाच करोनाग्रस्त रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

सध्या महाराष्ट्रात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३२वर पोहचली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १५ मार्चपासून सर्व टूर बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिझनेस आणि पर्यटन टूर रद्द केली आहे. १५ मार्चपासून ते ३१ मार्चपर्यंत ही बंदी कायम असणार आहे. मुंबई पोलिसांनी आदेश काढले असून हे आदेश न पाळल्यास कारवाई होणार आहे.

- Advertisement -

मुंबई मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येऊ नये किंवा जाऊ नये याकरिता मुंबई पोलिसांना परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आलं आहे म्हणजे आजपासून मुंबईत कलम १४४ लागू झालेला आहे. त्यानुसार मुंबईत कोणत्याही प्रकारची टूर करण्यावर बंदी घातली आहे. जर खूप महत्त्वाची टूर असले तर मुंबई पोलिसांची परवानगी घेणं गरजेचं असल्याची परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. ३१ मार्चपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

काय आहे कलम १४४?

  • कलम १४४ शांती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी लागू केला जातो.
  • हा कलम लागू केल्यानंतर चार किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एका ठिकाणी जमू शकत नाही.
  • जर कलम १४४चं पालन केलं नाही तर पोलीस अटक करू शकतात.
  • कलम १४४चं उल्लंघन केल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा – करोना अपडेट – औरंगाबादमध्येही करोना पॉझिटिव्ह रुग्ण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -