Covid Self Test Kit : आता विक्रेत्यांना कोविड सेल्फ टेस्टिंग किटबाबत पालिकेला माहिती द्यावी लागणार

त्यांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले तरी ते रुग्णालयात न जाता आपल्या फॅमिली डॉक्टरकडून सल्लामसलत करून घरच्या घरी औषधोपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन यापुढे 'कोविड सेल्फ टेस्टिंग किट'ची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सला त्याबाबतची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

sellers will have to inform BMC about covid self testing kit
sellers will have to inform BMC about covid self testing kit

मुंबईत ‘कोविड सेल्फ टेस्टिंग किट’ची ( Covid Self Test Kit ) विक्री करणाऱ्यांना आता किती किटची विक्री केली, कोणाला व कधी केली याबाबतची सविस्तर माहिती मुंबई महापालिकेला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने याबाबत एक नियमावली जाहीर केली आहे. मुंबईत अनेकजण सर्दी, खोकला झाला की कोविड चाचणी करून घेण्यासाठी पालिका, सरकारी, खासगी रुग्णालयात न जाता मेडिकल स्टोअर्समधून ‘कोविड सेल्फ टेस्टिंग किट’ची खरेदी करून त्याद्वारे परस्पर चाचण्या करीत आहेत. मात्र त्यातून त्यांना कोविडची लागण झाली अथवा नाही, याबाबतची माहिती उपलब्ध होऊनही ती दडवून ठेवण्यात येत आहे. जर त्यांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले तरी ते रुग्णालयात न जाता आपल्या फॅमिली डॉक्टरकडून सल्लामसलत करून घरच्या घरी औषधोपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन यापुढे ‘कोविड सेल्फ टेस्टिंग किट’ची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सला त्याबाबतची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

घरगुती चाचण्या किंवा रॅपिड अँन्टीजेन संच उत्पादक, विक्रेते यांना किटच्या विक्रीबाबतचे तपशील पालिकेला देणे आता बंधनकारक असणार आहे. घरगुती किंवा रॅपिड अन्टीजेन चाचण्यांचा वापर वाढला असून याचे अहवाल मात्र वापरणाऱ्यामार्फत संबंधित यंत्रणेला दिले जात नसल्याने आता वापरकर्त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा पालिकेने सुरू केली आहे. नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती पालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.

मुंबईतील केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स/डिस्पेन्सरी यांना विकल्या गेलेल्या किटचे फॉर्म A मध्ये आयुक्त , अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना ईमेल आयडी [email protected] वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर आयडी ही माहिती उपलब्ध करून देणे उत्पादकांना बंधनकारक करण्यात आले आहे
केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर दवाखाने ग्राहकांना विकल्या गेलेल्या होम टेस्टिंग अँटीजेन किटचा तपशील ‘बी’ फॉर्ममध्ये आयुक्त, FDA यांना ईमेल आयडी [email protected] वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेल आयडीवर द्यावा लागणार आहे. [email protected]
केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/ दवाखाने होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या खरेदीदाराला बिल जारी करतील आणि ज्या ग्राहकांना होम टेस्टिंग अँटीजेन किट्स विकल्या जातात त्यांची नोंद खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये ठेवली जाईल .

त्याचप्रमाणे या स्वरूपातील माहिती केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/डिस्पेन्सरी यांनी दररोज संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आयुक्त, FDA यांना ईमेल [email protected] वर तसेच एपिडेमियोलॉजी सेल, MCGM यांना mcgm या ईमेल आयडीवर शेअर केली जाईल. [email protected] आयुक्त, FDA हे मुंबईतील खरेदिदार नागरिक सर्व केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर्स आणि वितरकांच्या होम टेस्टिंग अँटीजेन किट्सच्या वितरण आणि विक्रीवर देखरेख ठेवतील . आयुक्त, FDA यांच्याकडून केमिस्ट/फार्मसी/मेडिकल स्टोअर/डिस्पेन्सरी यांना किट खरेदी करणार्‍या व्यक्तीला दिलेल्या ऍपवर चाचणी अहवाल कळवण्यास सांगितलं जाईल.


हेही वाचा –  Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या ‘WhatsApp Chatbot’ सुविधेचे लोकार्पण