घरमुंबईमुंबई-गोवा मार्गावर धावणार सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन, रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई-गोवा मार्गावर धावणार सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन, रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिली माहिती

Subscribe

मुंबई : मुंबई-गोवा रेल्वेमार्गावर लवकरच सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेन धावणार असून याबाबत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने ३ फेब्रुवारीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी वंदे भारत ट्रेन मुंबई-गोवा रेल्वेमार्गावर धावणार असल्याची माहिती दिली. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर आता मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

मुंबई-गोवा रेल्वे मार्ग पूर्ण
केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने सांगितले की, मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून पाहणीनंतर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल. शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या भेटीदरम्यान ठाणे आणि कोकण विभागातील रेल्वेच्या अनेक मुद्द्यांवर भाष्ट केले.
दरम्यान रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना स्टॉलचे वाटप, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोबाईल स्टॉल्स, रेल्वे पुलांमुळे होणारा पूर टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे आदी उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.

- Advertisement -

आमदारांची मागणी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत रेल्वे रुळांवर राहणाऱ्यांचे पुनर्वसन, सावंतवाडी-दिवा रेल्वे सेवा दादरपर्यंत वाढवणे आदी मुद्द्यांवर शिष्टमंडळाने दानवे यांच्याशी चर्चा केली. तसेच ठाण्यातील मुंब्रा स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी स्थानक करावे, अशी मागणीही आमदारांनी यावेळी केली. यासंदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव सादर केल्यानंतरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दानवे यांनी दिले.

लवकरच स्लीपर ट्रेन
वंदे भारत ट्रेन ही सध्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत नसली तरी भविष्याचा विचार करून स्लीपर डबे बनविण्यात येणार आहेत. २०२४ मध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी काही गाड्या ॲल्युमिनियमचा वापर करून बनविण्यात येतील. २०२४ च्या सुरुवातीला पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला २४ महिन्यांच्या आत स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवाव्या लागणार आहेत. तसेच ३५ वर्षांसाठी देखाभालीची जबाबदारी सुद्धा त्या कंपनीवर राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -