घरमुंबईबुडत्या वसईला आता परिसंवादाचा आधार

बुडत्या वसईला आता परिसंवादाचा आधार

Subscribe

वसई : ९ ते ११ जुलै दरम्यान बुडालेल्या वसईला पुढच्या पुरापासून वाचवण्यासाठी आता परिसंवादाचा आधार देण्यात येणार आहे.वसईच्या बुडीला कारणीभुत असणार्‍या पालिका आणि महसुल प्रशासनाला मात्र,या संवादातून जाणीवपुर्वक वगळण्यात आल्यामुळे वसईकर संतप्त झाले आहेत.

9 जुलैपासून सतत चार दिवस पडलेल्या पावसामुळे वसई तालुक्याचा संपुर्ण परिसर पाण्याखाली गेला होता. अभुतपुर्व अशा या पुरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.पाणथळ जागांवर अतिक्रमण,अनधिकृत भराव,बुंजवण्यात आलेले नैर्सगिक नाले,बावखले,नालेसफाईकडे दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे वसई बुडाली होती.सतत पाच दिवस विज,इंटरनेट,लोकल ट्रेन,अन्न-पाण्यावाचून वसईकर घरात अडकून पडले होते.

- Advertisement -

वसईच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्भवलेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध संघटनांनी वसई का बुडाली असा परिसंवाद ठेवला होता.त्यात सहभागी झालेल्या अनेक मान्यवरांनी महापालिका,वनविभाग आणि महसुल प्रशासनाला दोषी ठरवले होते.महापालिकेनेही एक समिती स्थापन करून 9 प्रभाग समितीत जन सुनावणी ठेवली होती.मात्र,दोषी असलेल्या पालिकेचेच अधिकारी ही सुनावणी घेत असल्यामुळे सर्वांनी या जनसुनावणीवर बहिष्कार टाकला होता.आता या मालिकेत आणखी एका परिसंवादाची भर पडणार आहे. 2 ऑक्टोंबरला वसईच्या न्यु इंग्लिश स्कुलमध्ये सायंकाळी 4 वाजता हा परिसंवाद रंगणार आहे.वसई पुन्हा बुडु नये असे आकर्षक नाव या संवादाला देण्यात आले आहे.

त्यासाठी खा.राजेंद्र गावीत,आ.हितेंद्र ठाकुर,माजी आमदार विवेक पंडीत,डॉमणिक घोन्सालविस,मार्कुस डाबरे,नीलेश तेंडोलकर,डॉमणिक डिमेलो,मनवेल तुस्कानो,फा.मायकलजी अशा सर्वपक्षीयांना आमंत्रित करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून सोशल मिडीयाद्वारे प्रश्न आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या.त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे गूगल फॉर्म बंद करण्यात आल्याचे आयोजकांकडून जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे वसईच्या समस्यांसाठी झुंजणार्‍या संघटना,कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. वसई पुन्हा बुडु नये असे खरोखर वाटत असेल तर या परिस्थितीला कारणीभुत असणार्‍या पालिका आणि महसुल प्रशासनाच्या अधिकार्‍यांना तसेच तज्ञांना या संवादात सहभागी का करून घेण्यात आले नाही.या संवादासाठी प्रश्न मागवताना आम्हाला का अंधारात ठेवण्यात आले.कोणत्या वेबसाईटवर प्रश्न मागवण्यात आले होते.त्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपिठाची माहिती अगोदर जाहीर करण्यात का आली नाही असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.

- Advertisement -

जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेख़र प्रभु यांच्या ठिकठिकाणी सभा घेवून वसई वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या पर्यावरण संरक्षण समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांच्याशी या संवादाबाबत संपर्क साधला असता,या व्यासपिठाची आम्हाला कोणतीच माहिती नाही.या परिसंवादासाठी आम्हाला आमंत्रितही करण्यात आलेले नाही असे त्यांनी सांगितले.

तर जेएनएसब्लॉग नावाची या प्रश्नांसाठी वेबसाईट तयार करण्यात आली होती.कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी त्यात आलेल्या प्रश्नांची छाननी करण्यात येत आहे.या संवादासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनाच निमंत्रीत करण्यात आल्याचे टिम जागरुक नागरिक संस्थेचे अध्यक्ष जॉय कोलासो यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -