शिवसेना भवनासमोर लागणार सेनेची ‘निष्ठा दहीहंडी’

गोपाळकाला उत्सव(दहिहंडी) आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी थरांची तयारी केली असून, दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहिहंडीच्या आयोजकांनीही तयारीला सुरूवात केली आहे. यंदा राज्यात शिंदे सरकार असल्याने मुंबई, ठाण्यातील दहीहंड्यांना मोठा मान असणार आहे.

shivsena bhawan

यंदा राज्यात शिंदे सरकार असल्याने मुंबई, ठाण्यातील दहीहंड्यांना मोठा मान असणार आहे. अशातच शिवसेना दादरच्या शिवसेना भवनासमोर निष्ठा दहीहंडीचे आयोजन करणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर एकनाथ शिंदे गट प्रतिशिवसेना भवन उभारणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाला आपली दाखवण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. (Sena Nishtha Dahi Handi to be held in front of Shivsena Bhavan)

शिवसेनेच्या दादरमधील शिवसेना भवनासमोरील ‘निष्ठा दहीहंडी’बाबत शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटवर माहिती दिली आहे. यावेळी ‘निष्ठा दहीहंडी’चा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘निष्ठा दहीहंडी! उत्सव निष्ठेचा, जल्लोष दहीहंडीचा’, असे लिहिण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. त्यामुळे आदित्या ठाकरे राज्यभरात निष्ठा यात्रा काढत आहेत. तसेच, या यात्रेच्य माध्यमातून आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तसेच, प्रत्येक निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे हे शिंदे गटावर टीका करत असून, गद्दार असल्याते म्हणत आहेत.

दरम्यान, या दहीहंडीच्या आयोजनावेळी शिंदे गट आणि शिवसेना शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, वरळीतही म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपा दहीहंडीचे आयोजन करणार आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपा दहीहंडीचे आयोजन करणार आहे. तसेच, श्रीराम मिल चौकात शिवसेना दहीहंडी लावणार आहे. त्यामुळे आता वरळीतही शिवसेना आणि भाजपाचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

गोपाळकाला उत्सव(दहिहंडी) आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. राज्यभरातील गोविंदा पथकांनी थरांची तयारी केली असून, दहिहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहिहंडीच्या आयोजकांनीही तयारीला सुरूवात केली आहे.


हेही वाचा – फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी