घरमुंबईकोविड सेंटरमधील डॉक्टरांना रुग्णालयात परत पाठवा! - केईएम मार्डचे पालिकेला पत्र

कोविड सेंटरमधील डॉक्टरांना रुग्णालयात परत पाठवा! – केईएम मार्डचे पालिकेला पत्र

Subscribe

कोरोना काळामध्ये कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेले निवासी डॉक्टर अद्यापही सेंटरमध्येच काम करत असल्याने रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कोविड सेेंटरमधील निवासी डॉक्टरांना पुन्हा रुग्णालयात पाठवण्यात यावे, असे पत्र केईएम रुग्णालयाच्या मार्ड संघटनेने पालिकेच्या आरोग्य विभागाला लिहिले आहे.

कोरोना रुग्णांच्या घटत्या संख्येमुळे जम्बो कोविड सेंटरमध्येही रुग्णांची संख्या तुरळक आहे. कोविड सेंटरमधील रुग्ण संख्या कमी होत असताना पालिका रुग्णालयांमधील अन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु कोरोना काळामध्ये कोविड सेंटरमध्ये नियुक्त केलेले निवासी डॉक्टर अद्यापही सेंटरमध्येच काम करत असल्याने रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर ताण पडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कोविड सेेंटरमधील निवासी डॉक्टरांना पुन्हा रुग्णालयात पाठवण्यात यावे, असे पत्र केईएम रुग्णालयाच्या मार्ड संघटनेने पालिकेच्या आरोग्य विभागाला लिहिले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने मुंबईमध्ये कोविड केअर सेंटर सुरु केले आहेत. या सेंटरमध्ये तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर डॉक्टरांची नेमणूक करण्याबरोबरच पालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील अनुभवी निवासी डॉक्टरांवरही जबाबदारी सोपवण्यात आली होती. केईएममधील साधारण २५ निवासी डॉक्टरांना नेस्को जम्बो कोविड सेंटर व काही जणांना सेव्हनहिल्स रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र आता कोरोना नियंत्रणात असून, लसीकरण मोहीमही वेगाने सुरू आहे. त्यातच कोविड सेंटरमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कोरोना रुग्ण उपचार घेत आहे. मात्र त्याचवेळी केईएममध्ये अन्य आजारांवरील रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून वाढ होत आहे. मात्र रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने वाढत्या रुग्णसंख्येचा ताण निवासी डॉक्टरांवर पडत आहे. त्यामुळे सेव्हनहिल्स, नेस्को कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेले केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना पुन्हा रुग्णालयात कार्यरत होण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी मार्डकडून करण्यात आली आहे. या डॉक्टरांना परत पाठविण्याबाबत आरोग्य विभागाला आम्ही पत्र पाठवले असून, मात्र त्यावर अद्यापही कोणतेही उत्तर आले नसून, आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. अरुण घुले यांनी सागिंतले.

कोविड सेंटरमध्ये निवासी डॉक्टरांना कायमस्वरुपी ठेवण्यात येणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या ज्याप्रमाणे कमी होत जाईल, त्याप्रमाणे निवासी डॉक्टरांना पुन्हा रुग्णालयामध्ये पाठवले जाईल.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -