घरCORONA UPDATEविधी अभ्यासक्रमाचे प्रवेश गुणवत्तेनुसार द्या

विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश गुणवत्तेनुसार द्या

Subscribe

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या परीक्षांबाबत अद्याप संभ्रम असल्याने विधी अभ्यासक्रमाची तीन आणि पाच वर्षाची सीईटी परीक्षा रद्द करावी. तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमाला विद्यार्थांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत. यातच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या परीक्षांबाबत अद्याप संभ्रम असल्याने विधी अभ्यासक्रमाची तीन आणि पाच वर्षाची सीईटी परीक्षा रद्द करावी. तसेच पाच वर्षीय अभ्यासक्रमाला विद्यार्थांना गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यातच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात या परीक्षा होतात. मात्र कोरोनामुळे यंदा प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे कॉलेजांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यात अडचण येणार असून, परीक्षांचे वेळापत्रकही बिघडण्याची शक्यता आहे. या विलंबामुळे विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच त्यांना शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वाटू लागली आहे.

- Advertisement -

विद्यार्थी इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याने हे विद्यार्थी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतील. यामुळे कॉलेजातील जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त राहून याचा फटका शिक्षक आणि कॉलेजांना बसणार आहे. त्यामुळे विधी कॉलेजांना विद्यार्थ्यांचे प्रवेश गुणवत्तेनुसार करण्यास परवानगी दिल्यास प्रवेश तसेच सत्र परीक्षा वेळापत्रकानुसार पार पडतील, अशी विनंती सुधाकर तांबोळी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -