Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ज्येष्ठ पत्रकार मधू उपासनी यांचे कर्करोगाने निधन

ज्येष्ठ पत्रकार मधू उपासनी यांचे कर्करोगाने निधन

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पत्रकारितेत झोकून दिले

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ पत्रकार, अध्यात्माचे उपासक मधुकर श्रीधर उपासनी यांचे शनिवारी सायंकाळी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. ते डोंबिवली येथे वास्तव्यास असून ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना डोंबिवली येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी पत्रकारितेत झोकून दिले होते. शासकीय सेवेत असतांना पत्रकारितेशी त्यांचा संबंध होता तो नंतर पूर्णवेळ पत्रकारितेत परिवर्तित झाला. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी चांगले काम केले. अध्यात्माची त्यांना प्रचंड आवड होती.

- Advertisement -

वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, दामुभाई ठक्कर, विजय वैद्य, विनायक बेटावदकर, कृ. वि. तथा नाना पेठे, भय्यासाहेब सहस्रबुद्धे, राजाराम माने यांच्या सह अनेकांबरोबर त्यांनी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे उत्तम कार्य केले. वसंतराव त्रिवेदी यांच्या सह त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अनेक अधिवेशनांना हजेरी लावून अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षापासून गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन, दैनंदिन पंचांग यांचा त्यांनी अनेकांना पुरवठा करुन सर्वांना प्रतीक्षा करायला लावली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील ऋषीतुल्य मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले.


- Advertisement -